esakal | 'नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले, मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर कुठे बिघडले ?'
sakal

बोलून बातमी शोधा

atul bhatkhalkar criticised on the statement of bhaskar jadhav in ratnagiri

भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विट करून शिवसेना आणि आमदार भास्कर जाधव यांना टोला लगावला.

'नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले, मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर कुठे बिघडले ?'

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले आणि इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे ? असे म्हणत भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विट करून आमदार भास्कर जाधव यांना टोला लगावला. भातखळकर यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले ? पोलीसही हप्ते घेतातच ना असे वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी काही दिवसापूर्वी गुहागर येथे शिवसेनेच्या मेळाव्यात केले होते. पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सावंत यांच्यावर अवैध दारुविक्री केल्याने कारवाई केली होती. त्याचा संदर्भ देत आमदार जाधव म्हणाले होते की, लोकांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर बिघडले कुठे ? पोलिस हप्ते घेतातच ना. कार्यकर्त्यांची पाठराखण करण्यासाठी जाधवांनी हे विधान केले. मात्र सोशल मिडीयावर त्याची वेगळीच चर्चा सुरू झाली. 

हेही वाचा - चालत्या रोरो वरून ट्रक कोसळला अन्...
 

अवैध दारू विक्रीला भास्कर जाधवांचे समर्थन आहे का ? अशी चर्चा सुरू असताना भाजपने भास्कर जाधवांच्या या विधानाला गांभीर्याने घेत पुन्हा एकदा शिवसेनेला टोला लगावला. नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले आणि इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे ? असे भातखळकर यांनी ट्विट केल्यानंतर त्याचीही चर्चा रंगली आहे. भास्कर जाधवांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू हे गुहागर मतदार संघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी या विषयावर फारसे भाष्य केले नाही. मात्र भातखळकर यांच्या ट्विटने पुन्हा एकदा भाजप विरूद्ध भास्कर जाधव असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. 
 

संपादन - स्नेहल कदम 

loading image