नारायण राणेंनी फुकाचे श्रेय घेऊ नये - काळसेकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सावंतवाडी - मराठा आरक्षणासाठी भाजपकडूनच प्रयत्न झाले ही वस्तुस्थिती आहे; मात्र माझ्याच अहवालातील सूचना घेतल्या, असे सांगून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत लगावला.

केवळ भाजप सरकारच्या सकारात्मक धोरणामुळे अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळू शकले. त्यात मराठा समाजाचेही तितकेच योगदान असेही काळसेकर म्हणाले. माजी आमदार राजन तेली, जगदेव कदम, प्रभाकर सावंत, राजू राऊत, बंड्या सावंत, मनोज नाईक, आनंद नेवगी, राजू गावडे उपस्थित होते.

काळसेकर म्हणाले, ‘‘भाजप सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने निवडणुकांच्या तोंडावर आरक्षणाची बोळवण केली होती आणि क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला होता; परंतु अर्धवट अवस्थेत असलेल्या परिस्थितीत न्यायालयात हे आरक्षण टिकले नाही; 

परंतु आमच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध निर्णय घेतले. राज्य मागास आयोगाची स्थापना केली आणि या माध्यमातून आरक्षण दिले; परंतू, राणे यांनी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपण अहवालात दिलेल्या शिफारशीनुसार आरक्षणाचा समावेश केला, असे सांगून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र यात त्यांचे कोणतेही क्रेडिट नाही; परंतु या सर्व प्रक्रियेत संपूर्ण राज्यभरात ३४ टक्के मराठा समाजाची लोकसंख्या आहे. हा राणे समितीने मुद्दा मांडला होता तो 
फायदेशीर ठरला.

तेली म्हणाले, ‘‘राज्याच्या इतिहासात मोठा निर्णय झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही गेली अनेक वर्षे मागणी होती त्याला आज न्याय देण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. त्याचा फायदा नक्कीच मराठा समाजाला होणार आहे.’’

Web Title: Atul Kalsekar comment