ऑस्ट्रेलियन विद्यार्थ्यांकडून ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

माणगाव - ऑस्ट्रेलियातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जिल्ह्यातील ग्रामीण जीवन समजून घेण्यासाठी दाखल झाले आहेत. निवजे आणि माड्याचीवाडी (ता. कुडाळ) येथे त्यांचा मुक्काम असून, इथल्या चांगल्या गोष्टींचा ते अभ्यास करतील; मात्र त्याचबरोबर येथील जीवन अधिक सुखकर करण्यासाठी ते आपल्या कल्पना मांडणार आहेत.

माणगाव - ऑस्ट्रेलियातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जिल्ह्यातील ग्रामीण जीवन समजून घेण्यासाठी दाखल झाले आहेत. निवजे आणि माड्याचीवाडी (ता. कुडाळ) येथे त्यांचा मुक्काम असून, इथल्या चांगल्या गोष्टींचा ते अभ्यास करतील; मात्र त्याचबरोबर येथील जीवन अधिक सुखकर करण्यासाठी ते आपल्या कल्पना मांडणार आहेत.

इंजिनिअर्स विदाऊट बॉर्डर्स या इंटरनॅशनल संस्थेच्या ऑस्ट्रेलियन शाखेतर्फे ऑस्ट्रेलिया येथील इंजिनिअर्स विभागाचे २० विद्यार्थी निवजे (ता. कुडाळ) येथे अभ्यासदौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. १७ तारखेपर्यंत गावात राहून ते इथली जीवनपद्धती, राहणीमान, भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण करून इथल्या चांगल्या गोष्टी आपल्या देशात नेणे व इथे सूचना सुद्धा देतील. ऑस्ट्रेलियन सरकारच्या धोरणानुसार इंजिनिअर व्हायचे असेल लोकांना काय पाहिजे हे जाणून घेतले पाहिजे व नंतर प्रोजेक्‍ट दिला पाहिजे. आपला प्रोजेक्‍ट लोकांवर लादू नये ही या प्रशिक्षणामागची भावना असल्याचे पुणे येथील अथेंटिका संस्थेच्या सायली जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ऑस्ट्रेलियन वंशाच्या अलांटा कोली यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून अथेंटिका संस्था व भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून निवजे गावची निड केली आहे. यापूर्वी त्यांचे कर्नाटक हुबळी येथे पाच दिवसांचे प्रशिक्षण झाले असून एकूण ४९ विद्यार्थी ऑस्ट्रेलियातून आले आहेत. कुडाळ तालुक्‍यातील माड्याचीवाडी येथे एक टिम व निवडे येथे एक टिम आहे.

दोन दिवसात निवडे येथे त्यांनी कुक्कुटपालन, शेळी मेंढीपालन, बायोगॅस, शेततळी, वायंगणी शेतीची पाहणी केली. बायोगॅस हा शेणावर चालणारा प्रकल्प त्याना अधिक भावल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या भागातील अतिथी देवो भव ही संकल्पना त्यांना खूप आवडली आहे. इथल्या लोकांना आपले काम सोडून वेळ दिला, परकी असूनही घरात झोपण्याची व्यवस्था केली. इथले विविध पदार्थही करून घातले याबद्दल विद्यार्थ्यांनी खूप समाधानी असल्याचे सांगितले. संपूर्ण प्रशिक्षणानंतर सावंतवाडी येथे २१ ला ते प्रोजेक्‍ट सादर करणार आहेत. या वेळी निवजे सरपंच महेंद्र पिंगुळकर, सुधीर राऊळ, नीलेश पालव, संतोष पिंगुळकर, दत्तप्रसाद सावंत उपस्थित होते.

Web Title: Australian students studying rural culture