स्वयंचलित मशीनने खड्डे भरण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

चिपळूण - मुंबई-गोवा मार्गावरील पेढे ते खेरशेत दरम्यान चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या खासगी कंपनीकडून आज महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरवात झाली. आज सायंकाळपर्यंत बहादूरशेखनाक्‍यात पडलेले मोठे खड्डे भरण्याचे काम सुरू होते. प्रत्यक्ष खड्डे भरण्याच्या कामास सुरवात झाल्याने महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना खड्डयातून मुक्ती मिळणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासनाकडून संबंधित कंपनीकडे पेढे ते परशुराम दरम्यानचा भाग महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी करारानुसार वर्ग करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील खड्डे इगल व चेतक या कंपनीकडून भरण्यास सुरवात झाली आहे. सकाळी 11 च्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामास सुरवात झाली. यंत्राद्वारे तयार होणाऱ्या मिश्रणाने खड्डे भरल्यानंतर किमान दोन तास त्यावरून अवजड वाहतूक बंद होणे आवश्‍यक आहे; मात्र बहादूरशेखनाका येथे सायंकाळी अवजड वाहनांची सतत वर्दळ असल्याने पुन्हा पुन्हा डांबरीकरण करावे लागत होते. बहादूरशेखा नाक्‍यानंतर उद्यापासून वाशिष्ठी पूल, कळबंस्ते, वालोपे ते पेढेपर्यंतच्या मार्गावरील खड्डे भरण्यात येणार आहेत. डांबर व केमिकलच्या मिश्रणामुळे किमान वर्षभर पुन्हा खड्डे पडणार नाहीत, असे जेटपॅचरवरील कर्मचाऱ्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत पेढे ते परशुराम मार्गावरील सर्व खड्डे भरले जाणार असून, वाहनचालकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Automatic machine start to fill up the pits