कशेडी घाटात मिनिडोअर रिक्षा व स्कोडा कार अपघात, आठ जखमी

सुनील पाटकर
सोमवार, 3 डिसेंबर 2018

महाड - मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दित मिनिडोअर रिक्षा व स्कोडा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मिनिडोअर चालक विश्वनाथ तळेकर (वय 46 रा. निवे जि रायगड) हे मिनिडोअर रिक्षा चालवत खेड कडून पोलादपूरकडे घाट उतरत होते. याच दरम्यान स्कोडा कार चालक मकरंद चिंगरकर हे स्कोडा घेऊन कशेडी घाट चढत असतांना चोळई गावच्या हद्दीत एका अवघड वळणावर दोन्हीं वाहनांचा समोरासमोर धडक झाली. 

या अपघातात चालक विश्वनाथ तळेकर, योगेश विठ्ठल मालुसरे (वय 28 रा खारघर), शीला विठ्ठल मालुसरे (वय 48), वृषभ सचिन मालुसरे (वय 4), वासंती दीपक चव्हाण, दिपीका दीपक केसरकर (वय 40 सर्व रा मुंबई), दगडू कांशीराम मिस्त्री (वय 55 रा कशेडी) व दर्शना दगडू मिस्त्री (वय 26 रा कशेडी) असे एकूण आठ जण जखमी झाले आहेत. 

या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्ग मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार मधुकर गमरे आणि पोलिस कर्मचारी सह घटना स्थळी धाव घेतली. सर्व जखमिंना तातडीने पोलादपूर ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि क्रेनच्या साहाय्याने दोन्हीं वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Web Title: autos and skoda car accidents, eight injured in Kashida Ghat