यंदाचा पाऊस कोकणासाठी लय भारी ! डोलू लागल्या भाताच्या लोंब्या

average rain register in konkan 3573 millimeter and its helpful to farming in ratnagiri district
average rain register in konkan 3573 millimeter and its helpful to farming in ratnagiri district

मंडणगड : कोकणात यावर्षी पावसाने मुक्कामच ठोकला. जूनच्या प्रारंभी निसर्ग वादळाच्या रुपात सुरू झालेल्या पावसाच्या मान्सून सरी नियमित कोसळल्या. तालुक्‍यात आतापर्यंत ३,५७३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून साडेतीन हजारांची सरासरी पार केली आहे. अश्‍विनचा अधिक महिना लागल्याने व गडगडाट करीत पूर्वा नक्षत्रातच सरींची उतराई झाल्याचे चित्र आहे. भात पसवणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जूनच्या पावसाच्या सरींवर भात लावणी आटोपली गेली. सुरू झालेल्या पावसाने उसंतच न घेतल्याने वरकस व पाणथळ लावणीची कामे यावर्षी खोळंबली नाहीत; मात्र पावसाने कोकणाला चांगलेच झोडपून काढले. पाणथळ भागात भात लावणी करताना शेतकऱ्यांना पाण्याचा अडथळा झाला. त्यावर मात करीत लावणीची कामे उरकली गेली. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्‍लेषा, मघा, पूर्वा ही नक्षत्रे यावेळी तुफान बरसली; मात्र पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारा कमीजास्त पाऊस हे गणित जुळून आले नाही.

परिणामी रोपांच्या वाढीवर त्याचा परिणाम जाणवला. काकडी, पडवळ, कारलीसारख्या वेलवर्गीय वनस्पतींना त्याचा मोठा फटका बसला आहे. उत्तरा नक्षत्रात पिके पसवणीला सुरवात होते; मात्र एक अधिकचा महिना लागल्याने पिके पसवण्यास सुरवात झाली आहे. मध्येच उन्हाचा कडाका असल्याने आशा निर्माण झाली आहे. काही हळवी पिके पसवू लागल्याचे चित्र दिसून येते; मात्र रोपांची उंची कमी राहिल्याने दाण्यांची संख्या कमी भरण्याची शक्‍यता आहे.

गरवी पिके अजूनही पसवली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जंगली श्‍वापदांचा शेतात वावर सुरू असल्याने पिके येण्याआधीच त्यांची नासाडी होत आहे. तुलनेत ३७७ मि. मी. पाऊस कमी तालुक्‍यात १ जून ते ७ सप्टेंबरपर्यंत एकूण ३५७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३,९५० मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी ३७७ मि.मी. पाऊस कमी पडला आहे.  तसेच २ सप्टेंबरपासून सहा दिवसांत फक्त ४८ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाल्याने पाऊस परतीच्या वाटेकडे निघाला असल्याचे चित्र आहे.

दृष्टिक्षेपात..

- ३,५७३ मि.मी. पावसाची नोंद
- वेलवर्गीय वनस्पतींना फटका
- जंगली श्‍वापदांचा वावर, पिकाची नासाडी

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com