रत्नागिरीत हे तालुके बनत आहेत कोरोना हॉटस्पॉट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

दापोली शहरात कोरोनाचे १०६ रुग्ण सापडले असून त्यांतील ७९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. २३ जणांवर उपचार सुरू असून ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दाभोळ : दापोली तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून तालुक्‍यात ८ सप्टेंबरपर्यंत ५११ जणांना लागण झाली असून, त्यांतील ३९२ रुग्ण बरे झाले आहेत. ९६ जणांवर उपचार सुरू आहेत, तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे. दापोली शहर, जालगाव, गिम्हवणे, हर्णै, पाजपंढरी, दाभोळ कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात डीसीएचसी सुरू झाल्यावर मृतांची संख्या कमी झाली असून त्यानंतर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाच - आता सरकारी नोकरीसाठी असणार ही नवीन अट 

दापोली शहरात कोरोनाचे १०६ रुग्ण सापडले असून त्यांतील ७९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. २३ जणांवर उपचार सुरू असून ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील ४०५ जणांना बाधा झाली होती. त्यांतील ३१३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले तर ७३ जणांवर उपचार सुरू असून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागामध्ये शहराजवळील जालगावमध्ये ७६ जणांना बाधा झाली. ४५ जण बरे झाले असून ३१ जण उपचार घेत आहेत तर जालगावजवळील ब्राह्मणवाडी येथील ४ जणांना बाधा झाली असून २ जण बरे झाले आहेत तर २ जणांवर उपचार सुरू आहेत.

गिम्हवणे येथील ३७ जणांना बाधा झाली असून, २३ जण उपचारानंतर बरे झाले असून १४ जण उपचार घेत आहेत. पाजपंढरी येथील ३३ जणांना लागण झाली होती, त्यांतील ३२ जण बरे झाले. हर्णै येथील ३९ जणांना लागण झाली होती, त्यातील ३२ जण बरे झाले. ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आडेत २४ जण बाधित झालेत. त्यातील २३ जण बरे झाले तर एकाचा मृत्यू झाला. दाभोळ येथील २५ जणांना बाधा झाली. त्यातील २३ बरे झाले. २ जणांचा मृत्यू झाला आहे. बुरोंडी येथील १३ बाधितांपैकी ११ बरे झाले. २ जणांचा मृत्यू झाला. लाडघर येथे १० बाधितांपैकी सर्व बरे झाले.

हेही वाच -  रिक्षावाले मामा बघताहेत वाट ; त्यांनाही हवाय शाळेच्या घंटेचा किणकिणाट

 

दृष्टिक्षेपात

दापोली शहरात ४ जणांचा मृत्यू
हर्णैत ५ जणांचा मृत्यू 
दाभोळमध्ये दोघांचा मृत्यू

आणखी ३ व्हेंटिलेटर

कोरोनाचा फटका बॅंकेतील कर्मचारी, शासकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी यांनाही बसला आहे. १५ ऑगस्टला डीसीएचसी सुरू झाले. सर्व २० बेड्‌सना ऑक्‍सिजनची सुविधा आहे. एक व्हेंटिलेटर असून आणखी ३ व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dabhol, dapoli and other four tehsils are corona hotspot in ratnagiri