कणकवली निराधारांसाठी जनजागृती

नागरिकांकडून स्वेच्छेने मदत; पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग
Awareness for destitute Kankavali
Awareness for destitute Kankavalisakal

कणकवली : निराधार, मतिमंद, दुर्लक्षित ज्येष्ठ यांची संख्या कमी करण्यासाठी तसेच अशा व्यक्तींना माणूस म्हणून जगण्यासाठी काय करता येईल. या उद्देशाने पणदूर येथील जीवन आनंद संस्था, कणकवली पोलिस ठाणे व ‘आम्ही कणकवलीकर’ यांच्या माध्यमातून शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या फेरीचा प्रारंभ झाला.

यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, सहाय्यक गटविकास अधिकारी सूर्यकांत वारंग, जीवन आंदन संस्थेचे संदीप परब, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, सचिव रवींद्रनाथ मुसळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. सुहास पावसकर, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, नगरसेविका मेघा गांगण, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर, जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी, संजय मालंडकर, काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर, निवृत्त मंडळ अधिकारी नामदेव जाधव, कलमठचे माजी सरपंच निसार शेख, राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे विजय भोगले, आचरेकर प्रतिष्ठानच्या सदस्या लीना काळसेकर,विजय गावकर, सुप्रिया पाटील, माजी नगरसेवक उमेश वाळके, प्रसाद अंधारी, बंडू खोत, शशांक बेळेकर, प्रिया सरुडकर आदी उपस्थित होते.

अनेकांकडून मदतीचा हात

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आप्पासाहेब पटवर्धन चौक आणि पुढे बाजारपेठमार्गे झेंडा चौक ते पटकी देवी मंदिर अशी फेरी काढण्यात आली. यात अंगणवाडी सेविका, सामाजिक संस्थांचे सभासद, पोलिस कर्मचारी, महिलांसह नागरिक सहभागी झाले होते.या फेरीत सहभागी झालेल्यांनी निराधारांच्या पुनर्वसनासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले. यावेळी फिरवण्यात आलेल्या दानपेटीत अनेकांनी मदत देखील केली.अनेकांकडून मदतीचा हात

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आप्पासाहेब पटवर्धन चौक आणि पुढे बाजारपेठमार्गे झेंडा चौक ते पटकी देवी मंदिर अशी फेरी काढण्यात आली. यात अंगणवाडी सेविका, सामाजिक संस्थांचे सभासद, पोलिस कर्मचारी, महिलांसह नागरिक सहभागी झाले होते.या फेरीत सहभागी झालेल्यांनी निराधारांच्या पुनर्वसनासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले. यावेळी फिरवण्यात आलेल्या दानपेटीत अनेकांनी मदत देखील केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com