esakal | पनवेल रेल्वेस्थानकात जन्मले बाळ; 10 महिन्यांतील दुसरी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल रेल्वेस्थानकात जन्मले बाळ

मंगला एक्‍स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती होण्याची घटना शनिवारी (ता. 15) घडली आहे. प्रवासादरम्यान वेदना जाणवू लागल्याने तिला रेल्वेस्थानकावरील महिलांच्या प्रतीक्षालयात नेण्यात आले. तेथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे जन्माला आलेले बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे. दोघांनाही जवळच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 

पनवेल रेल्वेस्थानकात जन्मले बाळ; 10 महिन्यांतील दुसरी घटना

sakal_logo
By
दीपक घरत

पनवेल : मंगला एक्‍स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती होण्याची घटना शनिवारी (ता. 15) घडली आहे. प्रवासादरम्यान वेदना जाणवू लागल्याने तिला रेल्वेस्थानकावरील महिलांच्या प्रतीक्षालयात नेण्यात आले. तेथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे जन्माला आलेले बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे. दोघांनाही जवळच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 

महत्त्वाची बातमी : मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन कधी होणार सुरू? बड्या मंत्र्यानं दिलं 'हे' उत्तर

केरळामधील एर्नाकुलम येथून दिल्ली येथे जाणारी कोव्हिड स्पेशल मंगला एक्‍स्प्रेस सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी पनवेलजवळ आली. या एक्‍स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या डॉली सनी (वय 25) या महिलेस प्रसूती वेदना जाणवत असल्याची माहिती रेल्वेस्थानकावर असलेल्या 1 रुपी क्‍लिनिकच्या डॉ. विशाल वाणी यांना देण्यात आली.

हेही वाचा : कोकण किनारपट्टी पर्यटनाच्या विकासाने बहरणार; स्थानिकांची होणार बेरोजगारीतून मुक्तता

डॉ. वाणी यांनी स्थानकावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिलेची रवानगी स्थानकावरील महिलांच्या प्रतीक्षागृहात केली. त्यानंतर सुरक्षितरित्या महिलेची प्रसूती घडवून आणली. पनवेल रेल्वेस्थानकावर मागील 10 महिन्यांत घडलेली ही दुसरी प्रसूती असून, नोव्हेंबर 2019 मध्येही मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या एका महिलेची सुरक्षित प्रसूती करण्याची प्रक्रिया डॉ. वाणी यांनी पार पाडली होती.

 (संपादन : उमा शिंदे)

loading image