esakal | मुंबईची लाइफलाईन लोकल ट्रेन कधी होणार सुरु? बड्या मंत्र्यानं दिलं 'हे' उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईची लाइफलाईन लोकल ट्रेन कधी होणार सुरु? बड्या मंत्र्यानं दिलं 'हे' उत्तर

सध्या लोकल ट्रेन नेमकी कधी सुरु होणार हा प्रश्न सर्वत्र जोर धरु लागला आहे. याबाबतच आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे संकेत दिलेत. 

मुंबईची लाइफलाईन लोकल ट्रेन कधी होणार सुरु? बड्या मंत्र्यानं दिलं 'हे' उत्तर

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  मुंबईत सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल ट्रेन धावत आहे. त्यामुळे बाकी नोकरदारवर्ग आणि कामगार वर्ग लोकलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अजूनही ताटकळत आहे. त्यातच लोकल पूर्ववत सुरू करा, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या लोकल ट्रेन नेमकी कधी सुरु होणार हा प्रश्न सर्वत्र जोर धरु लागला आहे. याबाबतच आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे संकेत दिलेत. 

मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार? असा प्रश्न सरकारला सातत्याने विचारला जात आहे. त्यावर भाष्य करताना मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेबाबत सरकारमधील प्रमुख मंत्री तसंच मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे. दोन दिवसांत याबाबत पुन्हा बैठक होणार असून त्यात सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. सामान्यांसाठी लोकलचे दरवाजे कधी उघडणार असा प्रश्न विचारताच आणखी दोन दिवस थांबा, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः ठाणेकर!  स्वातंत्र्यदिनी ही खास बातमी तुमच्यासाठी, नक्की वाचा

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा बंद आहे. राज्य सरकारने सातत्याने मागणी केल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या विशेष फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. लोकल लवकरच सुरू होणार अशी सातत्याने चर्चा होत आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ही शक्यता फेटाळली आहे.

अधिक वाचाः चलो कोकण! मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वे सोडणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या गाड्यांचा तपशील

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये लोकलसेवाही बंद करण्यात आली. त्यानुसार मुंबईत गेल्या चार महिन्यांपासून सामान्यांसाठी लोकलचे दरवाजे बंद आहेत. त्यानंतर मुंबईतील लोकल सुरू होण्याबाबत अनेक सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात होती. त्यानंतर केंद्राकडून याबाबत अधिकृत माहिती देणारं पत्रक प्रसिद्धीला देण्यात आलं. याबाबत आधी जो निर्णय घेण्यात आला होता त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुढील सूचनेपर्यंत उपनगरीय लोकलसेवा आणि पॅसेंजर ट्रेन बंद राहणार आहेत, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

maharashtra cabinet minister vijay wadettiwar reaction mumbai suburban local trains