विनापरवाना बंदुका बाळगल्याप्रकरणी  पाच जणांची जामिनावर मुक्तता 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

चिपळूण - विनापरवाना बंदुका व काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची जामिनावर सुटका झाली.

विनापरवाना बारा बोअर काडतुसाच्या दोन बंदुका व चार जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी महेश रवींद्र शिर्के, रोशन सुभाष पंडित, नीलेश राजाराम गजमल, प्रकाश केशव काताळकर व मयूर मोहिते या पाचजणांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातील गाडी, बंदुका व काडतुसे आदी मुद्देमाल जप्त केला होता.

दोन दिवसांपूर्वी त्यांना चिपळूण न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने त्यांना 29 तारखेपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांना पुन्हा चिपळूण पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

Web Title: bail of five men for illegal possession of guns

टॅग्स