शिल्पकलेत उमटली राजापुरी मुद्रा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

सचिनची पॅशन झाली करिअर - बाळासाहेबांच्या पुतळ्याने ओळख

राजापूर - ठाणे येथे उभारण्यात आलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सुमारे २२ फूट उंच पुतळा आणि वखार लुटून ब्रिटिशांवर जरब बसविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रामाची साक्ष सांगणाऱ्या पुतळ्याचे शिल्पकार अशी ओळख राजापूरचे सुपुत्र सचिन लोळगे यांनी मिळवली आहे. स्वतःच्या पॅशनला-आवडीला मुरड न घालता त्याचे करिअरमध्ये सचिन रूपांतर केले आहे. शिल्पकलेच्या क्षेत्रातील त्याची भरारी कोकणवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.

जयप्रकाश शिरगावकर, प्रशांत मसूरकर आदींच्या साह्याने त्याने सव्वानऊ फूट उंचीचा पुतळा साकारला आहे. कोणाचेही मार्गदर्शन वा मदतीची साथ त्याला नव्हती. मात्र, शिल्पकला हा छंद व ध्यास होता. त्याने साचेबद्ध नोकरी न निवडता याच क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. तालुक्‍यातील गोठणे दोनिवडे-हातणकरवाडीचा हा सुपुत्र. अवघ्या पस्तीशीमध्ये त्याने वेगळ्या वाटेने वाटचाल करताना नाव कमावले आहे.

गोठणे-दोनिवडेसारख्या ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शिक्षण, तर राजापूरमध्ये माध्यमिक  शिक्षण झाले. पेन, पेन्सिल वा त्यानंतर कुंचला यांच्या साह्याने तो झकास व्यक्तिचित्रे काढे. वडील लखू लोळगे, राजापूर हायस्कूलचे कलाशिक्षक श्री. केळकर, दापोलीचा मित्र श्रीराम महाजन यांच्यामुळे त्याच्यातील कलेला आणि कलाकाराला पैलू पडले. अर्थातच सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टस्‌चाही त्यात मोठा वाटा. तेथे आर्ट टीचरचा डिप्लोमा करून पुढे मुंबईतील जे. जे. स्कूलमध्ये जी. डी. आर्ट कल्चर हा डिप्लोमा त्याने केला. सरधोपट कलाशिक्षक होण्याऐवजी त्याची पॅशन त्याला खुणावत होती. मंदार दहीबावकर, संदीप राऊत, संजय सुरे यांच्या साथीने वसेनाप्रमुखांचा पुतळा, २१ फूट उंचीचा शंकर-पार्वतीचा पुतळा, गुजरातेत कच्छ येथे, राजस्थानात कोटा जिल्ह्यात त्याच्या शिल्पाकृती आणि पुतळे बसवले आहेत. ओणी येथील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत बसवलेला शांताराम भट यांचा पुतळा त्याने घडविला आहे. आरसीला क्रिएशन फर्म ही आता पुतळ्यांसाठी नवी मुद्रा बनली आहे. 

राजापूरच्या लाल मातीचा कपाळी लावलेल्या टिळ्याची चमक आणि त्यातून निर्माण झालेले कर्तृत्व देशाच्या नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात चमकवायचा मानस आहे. आपल्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये आई-वडिलांसह अनेक मित्रांचे आणि गुरुजनांचे योगदान मोलाचे आहे.
- सचिन लोळगे

Web Title: balasaheb thackeray statue make by sachin lolage