केरळातील बनाना चिप्स रत्नागिरीत, तर हापूस राजकोटला....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

पार्सल विशेष गाडीतून केरळातील बनना चिप्स रत्नागिरीत दाखल झाले असून रत्नागिरीतुन हापूसच्या 48 पेट्या राजकोट आणि वसईला रवाना झाल्या आहेत.

रत्नागिरी : लॉकडाऊनमध्ये सुरु केलेल्या पार्सल विशेष गाडीतून केरळातील बनना चिप्स रत्नागिरीत दाखल झाले असून रत्नागिरीतुन हापूसच्या 48 पेट्या राजकोट आणि वसईला रवाना झाल्या आहेत. तुलनेत बागायतदार यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

लॉकडाऊनच्या काळात हापूस आंबा वाहतुकीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरलेल्या कोकण रेल्वेची ‘स्पेशल आंबा पार्सल व्हॅन’ गुरुवारी 23 एप्रिलला रात्री 10 वाजता तिरुवनंतपूरम येथून रत्नागिरी स्थानकात दाखल झाली. या गाडीतून ओखाकडे काय जाणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. त्यात केरळ मधून आलेल्या या चिप्स कणकवली आणि रत्नागिरी स्थानकात उतरवल्या गेल्या. चिप्स चे सुमारे पन्नास बॉक्स रत्नागिरीत उतरवण्यात आले. याच बरोबर उड्डापी येथून मडगाव येथे तीन टन माल उतरवला गेला. 

हेही वाचा- दिलासादायक - सहा महिन्याच्या बाळाचा अहवाल निगेटिव्ह ;  रत्नागिरी कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर...

या गाडीतून कोकणातील हजारो टन अस्सल हापूस गुजरात राज्यात पोहोचल अशी अपेक्षा होती. मात्र स्थानिक बागायतदार यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून दुसरा टप्पा सुरु होण्यास अजून 4 ते 5 दिवस जातील असा अंदाज आहे. आंबा आवक वाढली कि मालही उपलब्ध होईल अशी अपेक्षा कोरे प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा- काही सुखद ! मनोरंजनात्मक गेम्सआधारे विद्यार्थ्यांचा अभ्यास  

अशी धावणार गाडी
ही गाडी रत्नागिरीतुन पुढे पनवेल, वसई रोड, वाफी, सुरत, बडोदा, भरूच, अहमदाबाद, सुरेंद्रनाथ नगर, राजकोट, ओखा अशामार्गे 15 तासात पोहोचणार आहे. या गाडीला 5 पार्सल डब्बे आहे. कोरोनामुळे लॉक डाऊनची स्थिती असताना कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. या करीता कोकण रेल्वेच्या मार्गावर रो रो व मालगाडीच्या बरोबरच स्पेशल पार्सल ट्रेन चालवल्या जात आहे.

27 ला पुन्हा धावणार 

कोरोना मुळे वहातुक व्यवस्था ठप्प असल्याने आंबा व्यावसायिकांना आंबा राज्यात व राज्या बाहेर पाठविण्यात कोकण रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे.रस्ते वाहतुकीपेक्षा निम्याहून  कमी दरात आंब्याची वहातुक कोकण रेल्वे च्या माध्यमातून होत आहे. 27 एप्रिल पासून कोकण रेल्वेच्या मार्गावर दुसरी पार्सल ट्रेन धावणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banana chips came in Ratnagiri and Hapus in Rajkot kokan marathi news