#MarathaKrantiMorcha रत्नागिरीत कडकडीत बंद 

राजेश शेळके
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - सकल मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी पुकारलेला बंद आज शंभर टक्के यशस्वी झाला. काही दुकाने मोर्चेकरांनी बंद पाडली. व्यापारी, एसटी महामंडळ, वाहतूूकदार, हॉटेल, टपर्‍या, शाळा आदींनी कडकडीत बंद पाळला.

रत्नागिरी - सकल मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी पुकारलेला बंद आज शंभर टक्के यशस्वी झाला. काही दुकाने मोर्चेकरांनी बंद पाडली. व्यापारी, एसटी महामंडळ, वाहतूूकदार, हॉटेल, टपर्‍या, शाळा आदींनी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे दुपारपर्यंत संपूर्ण जनजीवन ठप्प झाले होते. मारुती मंदिर सर्कल मोर्चेकरांनी ब्लॉक केला. तेथून मोर्चा शहरातील लक्ष्मी चौकापर्यत नेऊन तिथे विसर्जित केला. शांततेत कोणतेही गालबोट न लागता बंद यशस्वी झाला.

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र धगधगत असताना रत्नागिरी जिल्ह्यातून मराठा समाजाचा संदेश जावा, या उद्देशाने आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्यांनी यातून माघार घेतली असली, तरी रत्नागिरी तालुक्यात बंद यशस्वी झाला. सकाळी साडेनऊपासून नियोजनानुसार मारुती मंदिर सर्कलला मराठा मोर्चेकरी गोळा झाले.

 

कुवारबावपासून मुख्य बाजारपेठेपर्यंत सर्वांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. सुमारे साडेतीन हजार मोर्चेकरी जमा झाले. मारुती मंदिर येथे रास्ता रोको करण्यात आला. नीलेश राणेही रास्ता रोकोसाठी मोर्चेकरांबरोबर रस्त्यावर बसले. मराठा आरक्षणाचे महत्त्व पटवून देणारी अनेक उदाहरणे समाजातील सर्व थरातील लोकांनी यावेळी निषेध केला. आमदार उदय सामंत यांनीही याला पाठिंबा दिला. 

मराठा समाजाने आपली ताकद आज दाखवून दिली आहे. शासनाने आरक्षणासाठी दिरंगाई करू नये, अन्यथा मराठा समाजाला पुढचे पाऊल उचलावे लागले.

- नीलेश राणे, माजी खासदार

मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. मी ही त्या मताचा आहे. आंदोलनामुळे शासनही आरक्षण देण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र उद्रेक होण्यापूर्वी आरक्षण जाहीर करावे.

- उदय सामंत, आमदार

Web Title: Band in Ratnagiri for demand of Maratha Reservation