कणकवली उपनगराध्यक्षपदी बंडू हर्णे

Bandu Harne as Kankavali Deputy Mayor
Bandu Harne as Kankavali Deputy Mayor

कणकवली (सिंधुदुर्ग) - येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी गणेश उर्फ बंडू हर्णे यांची आज बिनविरोध निवड झाली. प्रांताधिकारी तथा पीठासन अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरपंचायतीची विशेष सभा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाली. यात उपनगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटाचे श्री.हर्णे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. 

उपनगराध्यक्ष निवडीनंतर श्री.हर्णे यांचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, नगरसेवक विराज भोसले, अभिजित मुसळे, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, उर्वी जाधव, अबिद नाईक, सुप्रिया नलावडे, शिशिर परुळेकर, संजय कामतेकर आदींनी अभिनंदन केले. तसेच उपनगराध्यक्ष निवड कार्यक्रमानंतर भाजप पक्षाचे कार्यकर्ते आणि बंडू हर्णे यांच्या चाहत्यांनी नगरपंचायतीबाहेर गर्दी केली होती. 

कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष म्हणून रवींद्र गायकवाड यांनी गेले अडीच वर्षे काम केले होते. पक्ष धोरणानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज उपनगराध्यक्षपदासाठी निवड झाली. यात श्री.हर्णे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. कणकवली नगरपंचायतीवर स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडीचे 11 तर विरोधी नगरसेवक शिवसेना-भाजपचे सहा सदस्य आहेत. 

कणकवली शहर विकासाच्या दृष्टीने जास्तीत जास्त योगदान देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसेच नगराध्यक्ष आणि इतर सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. 
- बंडू हर्णे, उपनगराध्यक्ष कणकवली  

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com