आंबेनळी मदतकार्य करणाऱ्या गिर्यारोहकांचा उतरवणार विमा

सुनील पाटकर
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

महाड : दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला आंबेनळी घाटात झालेल्या अपघातातील मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे खडतर काम पार पाडणाऱ्या महाड येथील सह्याद्री मित्र आणि सिस्केप या संस्थेच्या सदस्यांचा विमा उतरविण्याचा निर्णय येथील दि अण्णासाहेब सावंत को-ऑप. अर्बन बँक यांनी घेतला आहे.

बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष रमेश वैष्णव, संचालक महेंद्र पाटेकर, महम्मद अलि पल्लवकर, समिर सावंत, शहाजी देशमुख, नीता शेठ, नरेंद्र महाडिक तसेच बँकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी शोभा सावंत यांनी बँकेला 81 वर्ष पूर्ण झाल्याने बँकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. आंबेनळी घाटात आपला जीव धोक्यात घालून सह्याद्री व सिस्केप यासंस्थेच्या गिर्यारोहकांनी मृतदेह बाहेर काढण्याचे काम अहोरात्र राबून पूर्ण केले. 

असे जोखमीचे काम करणारे हे सर्व सदस्य कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता अपघातस्थळी तातडीने पोहचून मदत कार्य करत असतात. अशावेळी या सदस्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. अनेकदा असे काम करणाऱ्या सदस्यांचा विमा उतरविला गेला पाहिजे अशी कल्पना संकट काळात पुढे येत असे. याला बँकेने आता मुर्त स्वरूप दिले आहे. बँकेने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने सह्रयाद्री मित्रचे 16 व सिस्केपचे 21 सदस्य यांचा 5 लाख रूपयांचा  विमा त्वरीत उतरविला जाईल असे स्पष्ट केले. महाड अर्बनच्या सध्या 24 शाखा असून सर्वच शाखांमध्ये चांगल्या प्रकारे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: bank taken to Mountaineers insurance