esakal | कोकणात मधुमक्षिकापालन व्यवसायाला मिळणार चालना
sakal

बोलून बातमी शोधा

dapoli

कोकणात मधुमक्षिकापालन व्यवसायाला मिळणार चालना

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दाभोळ : दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लातूर येथील मधुमक्षिकापालन व्यावसायिक दिनकर पाटील यांच्यात नुकताच एक परस्पर सामंजस्य करार करण्यात आला आहे. मधुमक्षिकापालन, संवर्धन, संशोधन व शेतकऱ्यांना प्रशिक्षण असे या कराराचे स्वरूप आहे. या करारामुळे कोकणात मधुमक्षिकापालन व्यवसायाला चालना मिळणार आहे.

हेही वाचा: Teachers' Day 2021 - एका 'आई'ची जिद्द

लातूर येथील दिनकर पाटील हे गेली अनेक वर्षे या व्यवसायात असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा यामुळे विद्यापीठाला मिळणार आहे. भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाश्यांचे पालन केले जाते. अँपीसमिलीफिरा या मधमाशीने देशात मधुमक्षिकापालन व्यवसायात क्रांती केलेली असून, या मधमाशीचा कोकण विभागात कसा प्रसार करता येईल या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

मधुमक्षिकापालन व्यवसाय हा केवळ मध मिळविण्यासाठी केला जातो असा शेतकऱ्यांमध्ये समज असून, बागांमध्ये पर परागीभवनासाठी प्रामुख्याने या माश्यांचा उपयोग केला जातो. कोकणात ६३ प्रकारच्या वनस्पती वर्षभरात आपल्याकडे उगवतात त्या त्या भागात जर वर्षभराचे वेळापत्रक तयार करून जर मधपेट्या तेथे ठेवल्या तर वर्षभर मध मिळू शकणार आहे.

हेही वाचा: कोकण : मुंबईवरुन दापोलीकडे येणाऱ्या 'एसटी'ला अपघात

यासंदर्भात माहिती देताना विनायक पाटील म्हणाले कि लांजा, रत्नागिरी येथील आंबा बागायतदार दरवर्षी त्यांचेकडून आंबा बागेत लावण्यासाठी मधपेट्या घेऊन जातात. या मधमाश्यांमुळे आंबा बागेत परपरागीभवन होण्यास मदत होते व आंब्याचे तसेच काजूचे उत्पादन वाढण्यास मदत होते.

कोकणात मोठ्या प्रमाणात पाउस पडतो, या काळात या मधमाश्या येथे टीकत नाहीत त्यामुळे चार महिन्याच्या काळात या मधपेट्या ज्या भागात पाउस कमी पडतो त्या भागात पाठविण्यात येणार पाउस संपल्यावर त्या परत आणण्यात येणार आहेत. तीन वर्षे हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यात काय निष्कर्ष निघतील त्यानुसार पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आनंद नरंगळकर यांनी दिली.

हेही वाचा: Ratnagiri : चाचणी प्रयोगशाळेवरून वादंग

यासंदर्भात बोलतना विनायक पाटील म्हणाले कि, मधमाशी हा कीटक दुर्लक्षित राहिलेला असून तिचे गुणधर्म कोणीच पाहिलेले नाहीत. ज्यांना मधमाशीचे गुण कळले आहेत ते या व्यवसायात स्थिरस्थावर झाले आहेत. आपण मधमाश्यांचे ब्रीडिंगहि करत असल्याने मधमाश्यांचा तुटवडा या प्रकल्पासाठी भासणार नाही. या मधाला चांगली बाजारपेठ आहे, दरवर्षी आपण ४० टन मध हातोहात विकतो असेही पाटील यांनी सांगितले. कोकणात व व्यवसायाला चांगला वाव असल्याचेही पाटील म्हणाले.

यावेळी कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, कुलसचिव डॉ. भरत साळवी व विभागप्रमुख उपस्थित होते. संशोधन उपसंचालक डॉ.तोरणे यांनी प्रास्ताविक केले. या करारामुळे कोकणातील शेतकऱ्यांना कोकण कृषी विद्यापीठाकडून या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

loading image
go to top