esakal | Teachers' Day 2021 - एका 'आई'ची जिद्द; 25 वर्षानंतर मुलांसोबत अभ्यास करत झाल्या M.Sc
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers' Day 2021 - एका 'आई'ची जिद्द

Teachers' Day 2021 - एका 'आई'ची जिद्द

sakal_logo
By
- मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : बारावीनंतर पंचवीस वर्षांच्या खंडानंतर विवाह, घरसंसार, मुलांचे शिक्षण अशा गोष्टीत गुंतलेल्या गृहिणीने बीएस्सी व नंतर एमएस्सी (M.Sc in mathematics) (गणित) विशेष श्रेणीत उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे. (Teachers' Day 2021) राखी संजय जैन असे या गृहिणीचे नाव आहे. आई हा मुलांचा पहिला गुरु, शिक्षक असतो तसेच शिक्षणाला वयाचे बंधन नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत असून आईसुद्धा एमएस्सी झाल्याचे उदाहरण शिक्षणाची आवड असणाऱ्या अन्य गृहिणींना प्रेरणादायी आहे. (konkan News)

जैन यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले, माझे माहेर इंदापूर (पुणे) येथे. मराठी माध्यमातून शिक्षण झाले. दहावीला ८८ टक्के होते. १९९६ ला बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बारावीला गणितात टॉपर होते. शाळेत असल्यापासून गणिताची गोडी होतीच. विवाहानंतर रत्नागिरीत वास्तव्यास आले आणि मग घर, संसार सुरू झाला. मुले मोठी होताना त्यांना घरातच शिकवणे सुरू झाले.

हेही वाचा: जातीवादावरुन राष्ट्रवादीला राज ठाकरेंनी पुन्हा डिवचलं

माझे शिक्षण राहिले. पण घरातून मिळालेल्या प्रोत्साहनानंतर गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये माहितीकरिता गेले असता, गणित विभागप्रमुख व माजी उपप्राचार्य डॉ. राजीव सप्रे यांनी गणित विषय, त्यातील पुढील शिक्षण या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात बाहेरून बीएस्सी (गणित) करण्याची सुविधा नसल्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात २०१६ मध्ये प्रवेश घेतला. या विद्यापीठाचा अभ्यासक्रम तसा आव्हानात्मक वाटला. बीएस्सी करताना आत्मविश्वास नव्हता. पण हळुहळू यश मिळत गेले. गणितविषयक सर्व मार्गदर्शन डॉ. सप्रे यांनी केले.

परीक्षेला रत्नागिरीतून पुण्यात..

जैन म्हणाल्या, वीस वर्षांत अभ्यासच विसरले होते. त्यामुळे बीएस्सी करण्यापूर्वी अकरावी-बारावीचे गणित, त्यातील प्रॉब्लेम्स, फॉर्म्यूले असा सहा महिने अभ्यास केला. रत्नागिरीतून पुण्यात आदल्या रात्री परीक्षेला जायचे व लगेच पेपर झाल्यावर रत्नागिरी गाठायची, असे करायचे. पुण्यात परीक्षेला जायची धावपळ व्हायची. पेपर लिहायचा सरावही करायला लागला. सलग पेपर असायचे, तेव्हा माहेरी राहिले. आईलाही खुप कौतुक वाटायचे. कुटुंबातून पाठिंबा मिळाल्याने बीएस्सी झाले व लगेच पुढे एमएस्सीची तयारी केली. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. कोरोना कालावधीमुळे पेपर्स ऑनलाइन झाले. अलीकडेच निकाल लागला.

हेही वाचा: कोकण : मुंबईवरुन दापोलीकडे येणाऱ्या 'एसटी'ला अपघात

आता पीएचडी करणार शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. त्यामुळे आता एमएस्सीनंतर गणितामध्ये पीएचडी करण्याचा मानस असल्याचे राखी जैन यांनी सांगितले. सेल्फ स्टडीसोबत डॉ. राजीव सप्रे यांचे गणितासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. यु ट्यूबवरून ऑनलाइन लेक्चर्सही बघत होते, असे जैन यांनी सांगितले. त्यांची कन्या एमएस्सी (फिजिक्स) करत असून मुलगा सीएचे शिक्षण घेत आहे. मुलांसोबत त्याही एमएस्सीचा अभ्यास करत होत्या.

loading image
go to top