Politics : भास्कर जाधवांची राज्यपालांवर सडकून टीका; म्हणाले, राज्यपाल म्हणजे...

भास्कर जाधव यांनी चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज्यपालांवर टीका केली आहे.
konkan politics
konkan politics
Updated on
Summary

भास्कर जाधव यांनी चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज्यपालांवर टीका केली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरणात अनेक घडामोडी सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तर अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका सुरु झाल्या आहेत. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते भास्करराव जाधव यांनी चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज्यपाल कोश्यारींवर टीका केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसेना जाधव यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, राज्यपाल म्हणजे घरगडी आहेत. देशात भाजपकडून दडपशाही सुरु आहे. राज्यपाल कोश्यारींनी मराठी माणसांच्या विरोधात केलेल्या विधानावरुन लक्ष हटवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोपही जाधव यांनी यावेळी केला आहे.

konkan politics
Patra Chawl Case : संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल

पुढे भास्कर जाधव म्हणाले, मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संजय राऊत यांनी पत्र लिहिलं होतं. पाच ऑगस्टपर्यंत ईडीकडे त्यांनी वेळ मागितला होता. अधिवेशन संपल्यानंतर सात ऑगस्ट रोजी हजर राहण्याचंही सांगितलं होतं. पण राऊतांच्या पत्राला कोणतंही उत्तर न देता, लोकसभेचं अधिवेशन सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा वाचवणार? असा प्रश्नही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. 'मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये. त्याची गरजच नाही. आता लोकांना लोकशाही काय आहे, ते समजले. बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस सर्व कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचेच राबवतायत. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार न होता भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम राबवला जावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत.' असा टोला भास्कर जाधवांनी लगावला.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई संदर्भात एक वक्तव्य केलं होतं. यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज्यपालांवर विविध विषयांवरून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

konkan politics
अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार? मढ कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी पर्यावरण खात्याची नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com