नाणार प्रकल्प समर्थकांच्या मोर्चाला भूमीकन्या महामंडळाचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

रत्नागिरी - नाणार प्रकल्प रद्द झाल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची झोप उडाली आहे. पांढरपेशे काही उपटसोंडे पुन्हा नाणार प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकल्प आणायचा असले तर रत्नागिरीत आणा. पण पुन्हा नाणामध्ये होऊ देणार नाही.

रत्नागिरी - नाणार प्रकल्प रद्द झाल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची झोप उडाली आहे. पांढरपेशे काही उपटसोंडे पुन्हा नाणार प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकल्प आणायचा असले तर रत्नागिरीत आणा. पण पुन्हा नाणामध्ये होऊ देणार नाही.

मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. ती प्रक्रियेमध्ये आहे. तरी 20 तारखेला समर्थकांचा मोर्चा निघण्याची जाहिरातबाजी सुरू आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही, तरी आम्ही त्याच दिवशी तीन हजार नाणार विरोधक म्हणून गनिमी काव्याने शांततेत मोर्चाला विरोध करू, असा इशारा कोकण भूमीकन्या महामंडळाने दिला. 

पत्रकार परिषदेत सत्यजित चव्हाण, विश्‍वजित चव्हाण, नितीन जठार, संजय राणे, सोनाली ठुकरूल, शेवंती मोंडे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, गेली दोन वर्षे आम्ही स्थानिक म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध करीत आहोत. या प्रकल्पामुळे आमची घरं उद्‌ध्वस्त होणार आहेत. विरोध लक्षात घेऊनच शासनाने प्रकल्प रद्द केला.

शेत जमीन असतानाही बिगर शेतकरी शेत जमिनीचे मालक झाले आहेत. यामध्ये अनेक उद्योजकांसह गुुजराथ, मुंबई, पुणे, रत्नागिरी अशी राज्य व राज्याबाहेरील लोकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. मुंबई अधिनियम लागू असताना समर्थकांचा 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांपुढे रिफायनरीचा प्रचार सुरू ठेवला आहे, हे थांबले पाहिजे. 

...त्याची तमा बाळगणार नाही 
आम्ही देखील 20 तारखेला रिफायनरी विरोधक म्हणून मोर्चा काढण्याची परवानगी मागितली. मात्र, पोलिसांनी एका वेळी दोघांना परवानगी देण्यास नकार दिला. समर्थकांना मोर्चाची परवानगी दिली तर आम्ही प्रकल्पाचा विरोधात मोर्चा काढणार. त्यासाठी पोलिस दल परवानगी देऊदे नाही तर नाही, त्याची तमा बाळगणार नाही, असा इशार कोकण भूमीकन्या महामंडळाने दिला. 

मोर्चा नाणारमध्ये काढा... 
गुंतवणूकदार गोत्यात आल्यामुळे प्रकल्पाच्या समर्थनार्थ काही लोक अचानक उगवले आहेत. जागेवरून दलालांवर मोठा दबाव आहे. कोणती साडे सात हजार एकर जमिनीची संमती मिळाली आहे, ते समर्थकांनी दाखवून द्यावे. मोर्चा नाणारमध्ये काढा, म्हणजे किती समर्थक आहेत, ते दिसेल, असे आव्हानही दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhumikanya Mahamandal oppose to Nanar supporters march