भाजपची संवाद यात्रा थेट बांधावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

कणकवली - काँग्रेसने पंधरा वर्षे सत्तेत राहून फुकट घालवली. जनतेला विकासापासून वंचित ठेवले. पण केंद्रात मोदी सरकार येताच अवघ्या तीन वर्षात विकासाचा बॅकलॉग भरून निघाला. आता शेतकरी, मच्छीमार, बागायतदार यांच्या समस्या समजून घेण्यासाठी भाजपची संवाद यात्रा थेट शेताच्या बांधापर्यंत पोचणार असल्याची माहिती अतुल काळसेकर यांनी आज दिली.

कणकवली - काँग्रेसने पंधरा वर्षे सत्तेत राहून फुकट घालवली. जनतेला विकासापासून वंचित ठेवले. पण केंद्रात मोदी सरकार येताच अवघ्या तीन वर्षात विकासाचा बॅकलॉग भरून निघाला. आता शेतकरी, मच्छीमार, बागायतदार यांच्या समस्या समजून घेण्यासाठी भाजपची संवाद यात्रा थेट शेताच्या बांधापर्यंत पोचणार असल्याची माहिती अतुल काळसेकर यांनी आज दिली.

संवाद यात्रेत फक्त समस्या, प्रश्‍न समजावून घेतले जाणार नाहीत; तर पुढील दोन वर्षात या सर्व समस्यांचे निराकरण देखील होणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. प्रत्येक शेतकरी, बागायतदार, मच्छीमार आणि सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य दिले जाणार आहे, असेही श्री. काळसेकर म्हणाले. 

भाजपच्या संवाद यात्रेचे कोकण प्रमुख अतुल काळसेकर यांनी आज येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत संवाद यात्रेचे जिल्हा समन्वयक प्रभाकर सावंत उपस्थित होते. 

श्री. काळसेकर म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्षाने गेल्या पंधरा वर्षात विकासाची वाट लावली. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर मात्र वातानुकूलित केबिनमध्ये बसणारी ही मंडळी बाहेर संघर्ष यात्रेच्या निमित्ताने पडली. नेहमीच बडेजाव आणि राजेशाही थाटात वावरणाऱ्या या मंडळींनी संघर्ष यात्रा देखील गारेगार वातानुकूलित वाहनातून केली. तर थ्री स्टार हॉटेलमध्ये मुक्‍काम केला. यामुळे काँग्रेसची यात्रा सर्वसामान्यांसाठी नव्हती तर दिखाऊ होती. याउलट भाजपची यात्रा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचणार आहे. संवाद यात्रा म्हणजे, विविध शासकीय योजनांची माहिती आणि झालेले काम सर्वांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. २५ रोजी संवाद यात्रेचा शुभारंभ तर २६ मे ते १० जून पर्यंत पंडित दीनदयाळ शर्मा कार्यविस्तार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११० विभागात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाणार आहेत.’’

हे आम्ही करून दाखवले
जिल्ह्यातील १६ हजार कुटुंबांना उज्ज्वला कनेक्‍शन
१२ रुपये विमा योजनेचे जिल्ह्यात ७८ हजार लाभार्थी
मुद्रा योजनेतून ६ हजार लाभार्थींना १०० कोटींचे कर्ज
१४ हजारपेक्षा अधिक ग्राहकांनी जिल्ह्यात गॅस सबसिडी सोडली
मंत्र्यांचा लाल दिवा आणि राजेशाही थाट, बडेजाव घालवला

Web Title: BJP communicates with the direct contact