भाजपकडून आकसाने कारवाई नाही- चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

वेंगुर्ले ः ""माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे; मात्र भाजप कोणावरही आकसाने कारवाई करीत नाही,'' असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

येथील पालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी श्री. पाटील येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप गिरप, माजी आमदार प्रमोद जठार, शरद चव्हाण, पक्ष निरीक्षक अतुल काळसेकर, प्रसन्ना कुबल, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेने केंद्रात व राज्यात आम्हाला संधी दिल्यास देशाचा व राज्याचा चेहरामोहरा बदलू, असे आवाहन केले होते. त्यांच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संपूर्ण जनतेने केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमोल सहकार्य केले. त्यामुळे 62 वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली उतरावे लागले. जनतेने भाजपवर टाकलेला विश्‍वास सार्थकी लावण्यासाठी व जनतेला दिलेला शब्द खरा करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने धुरापासून सुटका मिळविण्यासाठी गृहिणींना मोफत गॅस कनेक्‍शन, अटल पेन्शन योजना, पीक योजना, सर्वांना हक्काची घरे अशा योजना राबविल्या.
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. आता नगरपरिषेदतही भाजपची सत्ता येणे आवश्‍यक आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेत भाजपची सत्ता आल्यास वेंगुर्लेचा चेहरामोहर बदलला जाईल.''

Web Title: bjp doesn't act out of grudge- chandrakant patil