Loksabha Election : महायुतीला बाजूला ठेवून भाजपची लोकसभा लढवण्याची तयारी? शिंदे, अजित पवार गट अस्वस्थ

महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत बावनकुळे यांनी दिले.
Raigad Loksabha Election
Raigad Loksabha Electionesakal
Summary

महायुतीच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते.

चिपळूण : भाजपकडून इच्छुक असलेले धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) हे रायगड लोकसभेचे उमेदवार (Raigad Loksabha Election) असतील, असे जणू संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुढील वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. युती, आघाड्यांची वाट न पाहता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

Raigad Loksabha Election
Karnataka : भाजपचं टेन्शन वाढवणारी बातमी! माजी मुख्यमंत्री करणार काँग्रेसमध्ये प्रवेश? 'या' युतीला केला विरोध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) महाविजय २०२४ मोहिमेच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात आले होते. गुहागर येथे त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. राज्यातील ४८ लोकसभेच्या जागांपैकी ४५ जागा आम्हाला जिंकायच्या आहेत. यापैकी एक रायगडची आहे. त्यामुळे रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असेल, असे त्यांनी जाहीर केले. धैर्यशील पाटील हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या जिल्हा दौऱ्यात सामील झाले होते.

Raigad Loksabha Election
Maratha Reservation : नारायण राणेंच्या मताशी मी सहमत, मराठा समाज कुणबी जातीचे दाखले घेणार नाही - रामदास कदम

त्यामुळे बावनकुळे यांच्या या दौऱ्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेवर हक्क सांगितला जाणे स्वाभाविक आहे.

महायुतीच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते; मात्र तरीही बावनकुळे यांनी आपल्या दौऱ्यात रायगडचा पुढील खासदार हा भाजपचाच असेल, असे जाहीर करून टाकले. भाजपच्या दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे भाजपचे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यामुळे तटकरे यांना बाजूला ठेवून भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

Raigad Loksabha Election
Maratha Reservation : ..तर हसन मुश्रीफांना कोल्हापुरात येण्यास बंदी करण्यात येईल; मराठा समाजाचा स्पष्ट इशारा

धैर्यशील पाटील यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झालेली नाही; मात्र भाजपचा उमेदवार दिवाळीनंतर जाहीर होणे अपेक्षित आहे. आम्हाला भाजपचाच उमेदवार जिंकून आणायचा आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. सुनील तटकरे विद्यमान खासदार आहेत. महायुतीचे नेते त्यांचा नक्कीच विचार करतील.

-आशिष खातू, जिल्हा उपाध्यक्ष, उत्तर रत्नागिरी भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com