भाजपचे प्रवक्ते काका कुडाळकर काँग्रेसच्या वाटेवर

तुषार सावंत
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

कणकवली -  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून याचा पहिला फटका भाजपला बसणार आहे.  भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर हे उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. 

कणकवली -  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून याचा पहिला फटका भाजपला बसणार आहे.  भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर हे उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मुंबईत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्री कुडाळकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना त्यांचे अन्य कार्यकर्ते काँग्रेसच्या संघर्ष यात्रेदरम्यान पक्षप्रवेश करणार आहेत. 16 ते 21 जानेवारी दरम्यान जिल्ह्यात हा संघर्ष यात्रेचा कार्यक्रम प्रदेश पातळीवरून आयोजित करण्यात आला आहे.

तत्पूर्वी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कार्यकर्ता मेळावा काँग्रेस घेणार आहे. हा मेळावा कुडाळ किंवा जिल्हा मुख्यालयात होण्याची शक्यता आहे. पक्षाला बळकटी देण्यासाठी काँग्रेसने तळागाळात पोहोचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू केला आहे. अन्य पक्षाचे काही कार्यकर्ते ही काँग्रेसच्या दिशेने पावले टाकत आहेत.

दरम्यान, काका कुडाळकर हे शिवसेनेत असताना खासदार नारायण राणे यांच्या वरदहस्ताने अनेक पदावर होते. त्यांचा प्रशासकीय आणि राजकीय अनुभव काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपमध्ये त्यांना म्हणावी तशी संधी मिळाली नव्हती. राणेंची साथ सोडून ते भाजपकडे गेल्याने अडचण झाली होती. आता काँग्रेसमध्ये त्यांना संधी मिळणार आहे. आगामी विधानसभेसाठी काँग्रेसकडून त्यांनी उमेदवार मिळण्याचीही शक्यता आहे

Web Title: BJP spokesman Kaka Kudalkar on the way to Congress