parag mehta
sakal
पाली - अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची चूरशीची निवडणूक बुधवारी (ता. 10) संपन्न झाली. या निवडणुकीत पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता निवडून आले. यावेळी नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि मित्रपक्ष यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व ढोल ताशा वाजवत एकच जल्लोष केला.