Kudal : गोवेरीत सापडला ब्लॅक पँथर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kudal : गोवेरीत सापडला ब्लॅक पँथर

Kudal : गोवेरीत सापडला ब्लॅक पँथर

sakal_logo
By
अजय सावंत

कुडाळ : गोवेरी येथे दुर्मिळ मानला जाणारा काळा बिबट्या अर्थात ब्लॅक पँथर सापडला. पाण्याच्या टाकीत पडलेल्या या सुमारे दोन वर्षाच्या काळ्या बिबट्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढले. भक्ष्याच्या मागे धावत असताना तो विहिरीत पडला असावा, असे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले.गोवेरी येथे तुकाराम राऊळ यांच्या आंबा-काजू बागेत सिंचनासाठी बांधलेल्या 7 ते 8 फूट खोल पाण्याची टाकी बांधलेली आहे.

हेही वाचा: Zomatoची सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून माघार, वाचा कारण!

आज सकाळी राऊळ बागेत आले असता टाकीत हालचाल जाणवली. त्यांनी वाकून पाहिले असता हा बिबट्या दिसला. त्यांनी त्याची माहिती वनविभागाला दिली. काही वेळातच वनविभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव पथकाने टाकीमध्ये पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पिंजऱ्यात घेत सुखरुप बाहेर काढले. भक्ष्याच्या मागे धावत असताना तो विहिरीत पडला असावा, असे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले. हा बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे दिड ते दोन वर्षे वयाचा आहे. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिंदे म्हणाले की, काळा बिबट्या अत्यंत दुर्मिळ मानला जातो. तो बिबट्या असला तरी जनुकीय बदलांमुळे त्याचा रंग काळा असतो. जिल्ह्यात ब्लॅक पँथरचा हा पहिलाच रेस्क्यू आहे. बिबट्या हा निशाचर असून बहुतांशी भक्ष्याच्या शोधात तो रात्री बाहेर पडतो. बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आढळणारे प्राणी जसे बेडूक, उंदीर, घुशी, ससे, साळींदर, घोरपड, पक्षी, माकडे यांपासून ते लहान आकाराची हरणे यावर तो उपजीविका करतो. हा अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानी असून परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक आहे.

हेही वाचा: कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; पालिकेचा होणार राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव!

हे बचावकार्य उपवनसंरक्षक शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक आय. डी. जालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनपाल मठ अ. स. चव्हाण, वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनरक्षक नेरूर तर्फ हवेली सावळा कांबळे, वनरक्षक मठ सुर्यकांत सावंत, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ दत्ताराम गावडे, सुशांत गावडे, बाळू खानोलकर, विश्वजित खानोलकर, अनंत राऊळ, ओंकार जाधव, सतीश गावडे यांच्या मदतीने यशस्वी केले.

loading image
go to top