अंध-अपंगांचे उपोषण स्थगित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

सावंतवाडी - अंधनिधीतून बेकायदा बांधकाम करून लक्ष्मीविष्णू कॉम्प्लेक्‍सच्या रहिवाशांना धोका निर्माण केल्याप्रकरणी महालक्ष्मी अंध अपंग सामाजिक संघटनेने छेडलेल्या उपोषणाला तिसऱ्या दिवशी तूर्तास स्थगिती दिली. 

आज या उपोषणाला उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी भेट देऊन प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २९ ला विविध पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभा घेत तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.

या वेळी पालिका बांधकाम अभियंता तानाजी पालव यांनी ही जमीन कार्यालय उभारण्यासाठी असल्याने तेथे आय हॉस्पिटल उभारले जाऊ शकत नसल्याचे या वेळी स्पष्ट केले. तसे आदेश देण्यात येतील; मात्र 

तत्पूर्वी या संदर्भांत येत्या २९ ला प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येईल, यात स्वतः अन्नपूर्णा कोरगावकर, नॅबचे अध्यक्ष व सचिव, तानाजी पालव तसेच विविध संघटनेने पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सभा बोलवून त्यात तोडगा काढण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर आज सौ. कोरगावकर यांच्या हस्ते पाणी पिऊन अंध अपंग बांधवानी पुकारलेले उपोषण आज तिसऱ्या दिवशी स्थगित केले. २९ पर्यंत ठोस कार्यवाहीची वाट पाहण्यात येणार असल्याचेही या वेळी अंध बांधवानी स्पष्ट केले आहे. उपोषण सोडतेवेळी मंगेश तळवणेकर, राजू मसुरकर, सुधीर पराडकर, नायब तहसीलदार श्री. वेंगुर्लेकर, सुनील पेडणेकर तसेच सत्यवान वारंग, भरत झाटये, अबुबक्कर शहा, रमेश शिरोडकर, आत्माराम परब, लक्ष्मीकांत चारी, बाळकृष्ण आरोसकर, हरिश्‍चंद्र राऊत, शकुंतला पणशीकर, सुनीता देसाई, श्रद्धा आंबेरकर, नारायण गावकर आदी अंध अपंग बांधव उपस्थित होते.

दरम्यान, ‘‘आय’ हॉस्पिटलला विरोध केल्याप्रकरणी नॅब मधून काढून टाकण्यात आल्याचा दावा करणाऱ्या त्या २२ अंध अपंग बांधवाना पुन्हा नॅब मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासनही या वेळी सौ. कोरगावकर यांनी या वेळी दिले.’’

Web Title: Blind-Handicapped of deferred fast