बोट सापडल्याने देवगडात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

देवगड- तालुक्‍यातील तांबळडेग येथील समुद्रकिनारी हवेवरील रबरी बोट (लाइफ राफ्ट) सापडल्याने एकच खळबळ उडाली. सुमारे वीस जण बसतील एवढी त्याची क्षमता आहे. बोटीत पाण्यासारखी दिसणारी पाकिटे, तसेच अन्य साहित्य असलेल्या बॅगाही सापडल्या आहेत. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बोटीची पाहाणी केली. मोठ्या बोटीवर बचावासाठी अशा प्रकारच्या लाइफ राफ्ट असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील माहितीसाठी तटरक्षक दलाची मदत घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

तांबळडेग येथील संजय कोयंडे हे मच्छीमारीसाठी गेले असता किनाऱ्यालगत नस्ताजवळ एक रबरी बोट असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी ती ओढत किनाऱ्यावर आणली. त्यामध्ये पाण्याने भरलेली एक बॅगही होती. याबाबतची माहिती पोलिस यंत्रणेला देण्यात आली. काही वेळाने पाण्यात अन्य काही साहित्याने भरलेली आणखी एक बॅग आढळल्याचीही माहिती मिळाली. ती बॅग समुद्राच्या लाटेबरोबर पाण्यात पडली असावी, असा अंदाज होता. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी, सागरी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत सहायक पोलिस उपनिरीक्षक ए. एस. गोसावी, राजन पाटील, कैलास इंपाळ, मृणालिनी सावंत आदी होते. पोलिसांनी बोटीची संपूर्ण तपासणी केली. या वेळी सरपंच नीलेश सादये, उपसरपंच रमाकांत सनये, पोलिसपाटील जयवंत मिठबावकर, जगदीश मालडकर, संजय कोयंडे, सागर मालडकर, जितेंद्र मालडकर, विष्णू धावडे, सुनील कोचरेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. बोटीतील बॅगेमध्ये पाण्यासारखे दिसणारे द्रव पदार्थाचे पाउच होते. सुमारे वीस जण बसतील एवढी बोटीची क्षमता आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठ्या बोटींवरील माणसांना जीव वाचविण्यासाठी याचा वापर केला जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बोटीबाबत तटरक्षक दलाशी संपर्क साधून माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर या बोटीबाबत माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी या बोटीची पाहणी केली.

मच्छीमारांची सतर्कता
समुद्रात काही संशयास्पद हालचाली आढल्यास, अज्ञात बोट दिसल्यास सतर्कता म्हणून स्थानिक मच्छीमार त्याबाबतची माहिती पोलिस यंत्रणेला देतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची ठरत आहे. 

Web Title: Boat excitement found devagad