

वादळी वारा आणि पाऊस यामुळे समुद्रातील वातावरण खराब झाल्याने मच्छीमारी नौका बंदरात थांबून आहेत.
esakal
Devgad Mango Weather Effect : देवगड तालुक्याच्या किनारी भागात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे मासेमारी ठप्प झाल्याने स्थानिक बाजारातील मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे दिवाळी सुटीत आलेल्या पर्यटकांना मासळीचा मनमुराद आस्वाद घेण्यात अडचणी जाणवत आहेत. बाजारातील उपलब्ध मासळीचे भाव वधारल्याने पर्यटकांच्या खिशालाही कात्री लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.