
-सुमित पाटील
बोईसर : शिवसेना व आधार प्रतिष्ठान व पालघर जिल्हा अॅथेलेटिक्स स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बोईसर वर्षा मॅरेथॉन २०२५ आयाेजित करण्यात आले हाेते. बोईसरमध्ये शिवसेना आणि आधार प्रतिष्ठान आयोजित क्लीन बोईसर ग्रीन बोईसरच ब्रीद वाक्य घेऊन बोईसर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा (तारीख.२४ )पार पडली. बोईसर च्या ओत्सवाल (धोडीपूजा)येथे या स्पर्धेला सकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये जवळपास पाच हजार पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते.तर या स्पर्धेत ज्येष्ठ मंडळींनीही सहभाग दर्शवला.