सांडेलावगणात अवरतय ‘पुस्तकांचे जग’

सांडेलावगणात अवरतय ‘पुस्तकांचे जग’

रत्नागिरी - माेबाईल, टीव्हीमध्ये गुंतलेल्या गावातील शाळकरी, महाविद्यालयीन मुलांसह सुशिक्षीत गावकर्‍यांमध्ये ‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती रुजविण्यासाठी सांडेलावगणसारख्या दुर्गम भागात ‘पुस्तकांचे जग’ अवतरले आहे. ही संकल्पना सांडेलावगणचा तरुण प्रसाद सुजाता सुरेश पाष्टे यांनी वर्षभरात यशस्वी केली.

भाकरी जगण्यासाठी उपयोगी पडते आणि पुस्तके जगायला शिकवतात, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य प्रत्यक्ष जीवनात आणतानाच पुस्तकांचे मित्र वाढविण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील सांडेलावगणमध्ये एक वर्षापुर्वी सार्वजनिक ग्रंथालय प्रसाद पाष्टेने सुरु केले. कवी मनाच्या प्रसादला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यातूनच ही मुहूर्तमेढ रोवली. भाडे भरुन एखादी खोली घेण्याची परिस्थिती नाही आणि गावात मोफत जागा मिळणे शक्य नाही, म्हणून घरातच हे ग्रंथालय थाटले.

सामाजिक बांधिलकीतुन मदत करणारे देणगीदारांचे सहकार्य मिळाल्याने विविध विषयांच्या सुमारे पाचशेहून अधिक पुस्तकांचा संग्रह करता आला. कथा, कादंबर्‍या, स्पर्धा परिक्षांची पुस्तक, लहान मुलांसाठीची पुस्तकांचा त्यात समावेश आहे. दीड हजार लोकसंख्येच्या गावातील महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये प्रसाद गेले वर्षभर वाचन संस्कृती रुजवतो. गावातील पस्तीस शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके तर अन्य तीस सभासद या ग्रंथालयाचा लाभ घेतात. दर दिवशी दहा ते बारा जणं या ग्रंथालयात येऊन वाचन सुविधेचा आनंद घेतात.

रॅक घेण्याएवढे पैसे जमा होईपर्यंत, लाकडी टेबलावरच पुस्तके मांडली. देणगीदारांमुळे नुकतेच दीड हजार पुस्तके राहतील असे रॅक त्याने खरेदी केले आहेत. या उपक्रमात प्रा. डॉ. सुनील अवचार, प्रा. विनायक गावडे, प्रा. प्रकाश नाईक, तेजस रेवाळे यांच्यासह तुषार मांडवकर, श्रद्धा इरमल, प्रणाली बैकर, राहुल बेनेरे, अमित कुळ्ये, धनंजय पाष्टे, शुभम कीर या मित्रांचे सहकार्य लाभले.

गावातील प्रत्येक रहिवाशाच्या घरापर्यंत मोफत पुस्तके पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महाविद्यालयीन जीवनात ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांमधून संवाद साधण्याची संधी मिळाली. त्याचा उपयोग जीवनातील प्रत्येक वळणावर होतोय.

- प्रसाद पाष्टे, संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com