बीएस ३ गाड्यांना ‘किट’ बसविणे बंधनकारक नाही - बाबासाहेब खंडागळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

सावंतवाडी - न्यायालयाच्या दणक्‍यानंतर डिस्काउंटमध्ये विक्री झालेल्या बीएस ३ इंजिनच्या गाड्यांची येत्या दोन दिवसांत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी नियमित टॅक्‍स वगळता अन्य कोणताही टॅक्‍स घेतला जाणार नाही, अशी माहिती जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब खंडागळे यांनी दिली. 

सावंतवाडी - न्यायालयाच्या दणक्‍यानंतर डिस्काउंटमध्ये विक्री झालेल्या बीएस ३ इंजिनच्या गाड्यांची येत्या दोन दिवसांत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी नियमित टॅक्‍स वगळता अन्य कोणताही टॅक्‍स घेतला जाणार नाही, अशी माहिती जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब खंडागळे यांनी दिली. 

डिस्काउंटच्या माध्यमातून गाड्या घेतल्यानंतर त्या गाड्यावर बीएस किट बसविणे बंधनकारक आहे. आणि त्या किटची किंमत तब्बल १७ ते १८ हजार इतकी आहे. त्यामुळे ते बसविणे शक्‍य नसल्यास ८ ते १० हजार रुपये आरटीओकडे टॅक्‍स भरावा लागणार आहे, असे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी आरटीओ विभागाशी संपर्क साधला असता श्री. खंडागळे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘न्यायालयाने दिलेल्या आदेशात ३१ मार्चपर्यंत गाड्या विक्री करण्यात याव्यात आणि त्यानंतर विक्री केलेल्या गाड्यांना रजिस्ट्रेशन देण्यात येणार नाही, असे 
म्हटले होते. यानुसार जिल्ह्यात ३१ मार्चपूर्वी अडीचशेहून गाड्यांची नोंदणी केली आहे. त्यानंतर आदेशानुसार पुढील विक्री-खरेदी बंद केली आहे. ज्या गाड्या न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ मार्च पूर्वी खरेदी केल्या आहेत, त्यांना येत्या दोन दिवसात 

रजिस्टेशन देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यानंतर येणाऱ्या गाड्यांचा प्रश्‍नच येत नाही. तसे वरिष्ठ विभागाचे आदेश आहेत. त्यामुळे कोणी सोशल मीडियावर सुरू असलेल्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये नियमित टॅक्‍स 
वगळता प्रादेशिक विभाग कार्यालयाकडून अन्य कोणताही टॅक्‍स वसूल करण्यात येणार नाही. आणि तसे कोणी सांगत असतील तर थेट आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा.’’

ग्राहकांची फसवणूूक 
न्यायालयाच्या निर्णयानंतर काही गाड्यांवर अठरा हजार पाचशे तर काही गाड्यांवर तेरा हजार पाचशे अशी सूट कंपनीकडून जाहीर करण्यात आली होती; मात्र कंपनीच्या निर्णयाला जिल्ह्यातील काही शोरूम मालकांकडून हरताळ फासण्यात आला. काही ठिकाणी तर सात ते आठ हजार सूट देऊन गाड्या विकण्यात आले; मात्र तितके तर तितके असे समजून काही ग्राहकांनी गाड्या खरेदी केल्या.

Web Title: BS-3 vehicles are not required to set up 'kit'