बीएसएनएलचा मोबाइल टॉवर सील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

खेड - वारंवार सूचना करूनही थकीत कर न भरल्याने पालिकेने भारत संचार निगमचा भ्रमणध्वनी टॉवर सील केला. नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि वसुली विभागाचे अधिकारी यांनी ही कारवाई केली. शासकीय मालमत्तेवर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. 

भारत संचार निगमचा येथील तीनबत्ती नाका परिसरातील एका इमारतीवर भ्रमणध्वनी टॉवर आहे. गेली आठ वर्षे या टॉवरचा पालिका कर न भरल्याने कराची रक्कम १ लाख ३३ हजार रुपये इतकी झालेली आहे. थकीत रक्कम पालिकेत भरणा करावी, अशा सूचना संबंधित कंपनीला वारंवार करण्यात आल्या होत्या, परंतु पालिकेच्या या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याने आज पालिका प्रशासनाने कारवाईची कठोर पावले उचलत तीनबत्ती नाका परिसरातील इमारतीच्या टेरेसवर असलेला भ्रमणध्वनीचा टॉवर अखेर सील केला. खेड पालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली विभागाचे पर्शुराम पाथरे व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.

Web Title: bsnl mobile tower seal