Baffalo: गोठ्यातल्या रेड्याने केला महिलेवर हल्ला; झाली गंभीर दुखापत

Baffalo: गोठ्यातल्या रेड्याने केला महिलेवर हल्ला; झाली गंभीर दुखापत
Published on

Baffalo: रेड्याच्या हल्ल्यात पारपोली येथील महिला गंभीर जखमी झाली. रश्मी रामकृष्ण गावकर (वय ४५, रा. गावठाणवाडी) असे तिचे नाव आहे. ही घटना आज सकाळी घडली. जखमी महिलेस तातडीने उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.


रश्मी गावकर या नेहमीप्रमाणे आज सकाळी गोठ्यातून रेड्याला शेतात चारायला घेऊन जात होत्या. यावेळी अचानक रेड्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचे हात, पाय, डोके व छातीला गंभीर दुखापत झाली.

Baffalo: गोठ्यातल्या रेड्याने केला महिलेवर हल्ला; झाली गंभीर दुखापत
Maharashtra Updates: राज्यात मुसळधार पाऊस ते ओबीसी समाज आक्रमक! प्रत्येक अपडेट एका क्लिकवर वाचा...

यानंतर रेड्याने शिंग खुपसून त्यांना गंभीर जखमी केले. ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी तातडीने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयाचे डॉ. निखिल अवधूत यांनी प्राथमिक उपचार केले.

अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नाही. जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.

Baffalo: गोठ्यातल्या रेड्याने केला महिलेवर हल्ला; झाली गंभीर दुखापत
Maharshtra News : राज्यात 20 जणांकडे पॅथॉलॉजीची ‘बोगस’ पदवी! मुक्त विद्यापीठाकडून पडताळणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com