Maharshtra News : राज्यात 20 जणांकडे पॅथॉलॉजीची ‘बोगस’ पदवी! मुक्त विद्यापीठाकडून पडताळणी

20 people in state have bogus degree in pathology nashik news
20 people in state have bogus degree in pathology nashik newsesakal

Nashik News : राज्यातील २० विद्यार्थ्यांनी बीएस्सी एमएलडी, डीएमएलटी या बनावट पदव्या घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पॅरावैद्यक परिषदेने त्यांच्याकडे आलेली कागदपत्रे नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे पडताळणीसाठी पाठविली होती. (20 people in state have bogus degree in pathology nashik news)

पडताळणीअंती ती कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मुक्त विद्यापीठातर्फे नाशिक तालुका पोलिसांत बनावट कागदपत्रे व पदवी देणाऱ्या राज्यातील चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

गौरव अनिलकुमार शिरसकर (रा. साईरचना अपार्टमेंट, खायरी, नागपूर), रमेश होनमोरे (रा. कराड, जि. सातारा), अशोक ज्ञानदेव सोनवणे (रा. रुद्र एज्युकेशन सोसायटी, दिल्ली गेट, अहमदनगर), संजय गोविंद नायर (रा. महानंदानगर, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा कक्षाचे उपकुलसचिव मनोज घंटे (रा. नाशिक) यांनी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यानुसार गेल्या २०२० मध्ये राज्यातील २० जणांनी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याकरिता परवानगीसाठी महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे अर्ज केले होते.

याबाबतच्या पदवी व पदविका गुणपत्रकांसह कागदपत्रांची पडताळणीसाठी पॅरावैद्यक परिषदेने मुक्त विद्यापीठाकडे पाठपुरावा केला होता. विद्यापीठाच्या पडताळणीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांची नोंदणीच झाली नसल्याची बाब उघडकीस आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

20 people in state have bogus degree in pathology nashik news
YCMOU News : मुक्‍त विद्यापीठात शिक्षण अवघ्या 'इतक्या' रुपयांत! विद्यार्थ्यांना शुल्‍कात सवलतीची संधी

मुक्त विद्यापीठाने तपासाअंती संबंधित २० विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटिसा बजाविल्या असता, त्यातील यवतमाळमधील सात विद्यार्थ्यांनी सेंटर फॉर एज्युकेशनच्या संशयित शिरसकरकडून, ठाणे जिल्ह्यातील तिघांनी साताऱ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील होनामोरेकडून, अहमदनगरच्या एकाने सोनवणेकडून आणि जळगाव, मनमाडच्या दोन विद्यार्थ्यांनी नायरकडून बनावट कागदपत्रे तयार करून घेतल्याचे विद्यापीठाला सांगितले.

विद्यापीठाकडून चौकशी

मुक्त विद्यापीठात २०२१ पर्यंत बीएस्सी एमएलडी व डीएमएलटी हे दोन अभ्यासक्रम होते. यूजीसीच्या निर्देशानुसार हे दोन्ही अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठाने बंद केले आहेत. पॅरावैद्यक परिषदेने ५ ऑक्टोबर २०२० व ४ जानेवारी २०२१ ला २० विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी मुक्त विद्यापीठाकडे पाठविले.

विद्यापीठाने ई-मेलद्वारे संबंधित विद्यार्थ्यांची नोंदणीच नसल्याचे स्पष्ट केले. पॅरावैद्यक परिषदेने ९ मे २०२२ तक्रार करण्यास विद्यापीठाला कळविले. तत्कालीन कुलगुरू प्रशांत पाटील यांनी चौकशी समिती नियुक्त केली. या चौकशी समितीने ३० डिसेंबर २०२२ ला दिलेल्या अहवालानुसार या विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडे नोंदणी नसल्याचेच आढळून आले.

20 people in state have bogus degree in pathology nashik news
200 Crore Fraud Case : परदेशात जाण्यासाठी जॅकलीनला मिळाला 'ग्रीन सिग्नल'! कित्येक महिन्यांपासून सुरु होता संघर्ष

तसेच, कायम नोंदणी क्रमांक, गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र, लेटरहेडही बनावट असल्याचे स्पष्ट केले. या कागदपत्रांवर तत्कालीन उपकुलसचिव जयवंत खडताळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परंतु ते २९ जानेवारी २०२१ ला निवृत्त झाले आहेत. तसेच चौकशी समितीने घेतलेल्या जबाबानुसार त्या स्वाक्षऱ्या त्यांच्या नाहीत.

त्यांनीच दिली नावे

बोगस पदव्या घेतलेल्या २० विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या वकील ॲड. सुनीता लाड यांनी मे, जून २०२३ मध्ये कायदेशीर नोटिसा बजावली असता, त्यापैकी १३ जणांनी सदरील कागदपत्रे तयार करून देणाऱ्यांची नावे कळविली होती. तर एकाने दिलेल्या उत्तरात कोणत्याही संशयिताचे नाव नाही. उर्वरित सहा जणांनी नोटिशीला उत्तर दिलेले नाही.

20 people in state have bogus degree in pathology nashik news
YCMOU News: ‘मुक्त’मध्ये प्रवेशार्थींना ABC नोंदणी सक्‍तीची! राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com