'कळसुलकर विकासाचा मास्टर प्लॅन तयार करू'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

सावंतवाडी - कळसुलकर इंग्लिश स्कूलशी बालपणीच्या आठवणी गुंतल्या आहेत. या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्याशी चर्चा करून कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विकासाचा मास्टर प्लन तयार करू, अशी ग्वाही गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दहीपक केसरकर यांनी येथे दिली. 

सावंतवाडी - कळसुलकर इंग्लिश स्कूलशी बालपणीच्या आठवणी गुंतल्या आहेत. या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्याशी चर्चा करून कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विकासाचा मास्टर प्लन तयार करू, अशी ग्वाही गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दहीपक केसरकर यांनी येथे दिली. 

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी संघाने अंदाजे पाच लाख रुपये खर्चाच्या सुसज्ज स्वच्छतागृहाचा प्रकल्प हाती घेतला आहे. याचा प्रारंभ श्री. केसरकर यांच्या हस्ते झाला. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सावंतवाडी एज़्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजन पोकळे, माजी विद्यार्थी संघाचे माजी सचिव दिनेश पांगम, उपाध्यक्ष अरविंद शिरसाट, डॉ. प्रसाद नार्वेकर, सहसचिव मोहन वाडकर, कोषाध्यक्ष व्ही. एन. सातावळेकर, एज्युकेशन सोसायटीचे संचालक रमेश बोंद्रे, कार्यवाह अशोक दळवी, नरेंद्र देशपांडे, मुख्याध्यापक सी. ए. काटे उपस्थित होते. 

श्री. केसरकर म्हणाले, ""माजी विद्यार्थ्यांनी कळसुलकर शाळेच्या विकासासाठी कौतुकास्पद एकजटू दाखवली. ती अशीच कायम ठेवावी. माजी विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून शाळेच्या सर्वांगीण विकासाचा मास्टर प्लॅन बनवू, त्यासाठी संस्थाध्यक्ष व नगराध्यक्षांनी पाठपुरावा करावा. स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी माजी विद्यार्थी संघाने स्वीकारली, त्यांचे हे पाऊल दखल घेणे जोगे आहे. शाळेच्या या कार्यासाठी तत्काळ साडे सात लाख रुपये मंजुरीचे पत्र प्रशासनाला देऊ आणि शाळेला अधिका-अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करू.'' 

श्री. साळगावकर म्हणाले, ""कळसुलकर शाळेच्या परिसरासंदर्भात पालिकेकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करू. शैक्षणिक सुविधा, मुलांचे आरोग़्य हा कळीचा मुद्दा आहे, याची पालिका दखल घेईल.'' 

स्वच्छतागृहासाठी शाळेला विनामूल्य प्लॅन बनवून देणारे जीवन प्राधिकरणचे अभियंता तथा माजी विद्यार्थी राजेंद्र मेस्त्री, बांधकामाची जबाबदारी स्वीकारणारे बांधकाम व्यावसायिक तथा माजी विद्यार्थी शैलेश पई यांचा पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघाचे संचालक राजश्री टिपणीस-विचारे, दुर्गेश सबनीस, गौरांग चिटणीस, रवींद्र स्वार, तुषार विचारे, किशोर सावंत, शिक्षक संतोष वैज उपस्थित होते. डॉ. प्रसाद नार्वेकर प्रास्ताविक केले. ओंकार तुळसुलकर यांनी सूत्रसंचालन केले. मोहन वाडकर यांनी आभार मानले. 

Web Title: Build a master plan for development