बीम कोसळून कामगाराचा हात तुटला 

building collapse workers injured kankavli sindhudurg
building collapse workers injured kankavli sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरातील पटवर्धन चौकातील एका कॉम्प्लेक्‍स इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना लिंटल कोसळले. यात एका कामगाराचा हात कोपरापासून तुटला. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. भीमराय घुनाळी (वय 50) असे जखमीचे नाव आहे. त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. 

शहरातील पटवर्धन चौकालगत संबंधित कॉम्प्लेक्‍स आहे. तेथे पहिल्या मजल्याचे काम सुरू आहे. दुपारी तीनच्या सुमारास तेथील विटांची भिंत तोडण्याचे काम सुरू होते. भिंतीला असलेले संपूर्ण लिंटल बीम कोसळले. बीम भीमराय यांच्या उजव्या हातावर कोसळल्यानंतर हात कोपरापासून तुटून लेंटलसोबत खाली पडला. अपघातामध्ये भीमराय यांच्या छातीला आणि पायलाही मार बसला. अपघातानंतर तेथील कामगारांनी आरडाओरडा केला. गाळेधारक आणि पटवर्धन चौकातील नागरिकही घटनास्थळी जमा झाले. जखमी भीमराय यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर गोमेकॉत पाठविण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com