तारकर्ली येथे मासळी ऐवजी चक्क कचऱ्याचा बंपर

प्रशांत हिंदळेकर
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

मालवण - तालुक्यातील तारकर्ली एमटीडीसी नजीकच्या समुद्रात मेथर रापण संघाच्या रापणीस आज सकाळी मासळी ऐवजी चक्क कचऱ्याचा बंपर मिळाला.

मालवण - तालुक्यातील तारकर्ली एमटीडीसी नजीकच्या समुद्रात मेथर रापण संघाच्या रापणीस आज सकाळी मासळी ऐवजी चक्क कचऱ्याचा बंपर मिळाला.

मेथर रापण संघाने मासळीसाठी रापण टाकली होती. रापणीत मोठ्या प्रमाणात मासळी मिळेल यादृष्टीने रापण ओढली असता त्यात मासळी ऐवजी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक तसेच अन्य प्रकारचा कचरा सापडल्याने मच्छीमार चक्रावून गेले.

सध्या मत्स्यदुष्काळ, पर्ससीनच्या मासेमारीचे संकट आवसून उभे असताना आता मानवनिर्मित प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येने पारंपरिक मच्छीमारांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. समुद्रात असलेल्या प्लास्टिक तसेच अन्य प्रकारच्या कचऱ्यामुळे सागरी जैवविविधता धोक्यात आली आहे. कचरा, सांडपाणी तसेच अन्य प्रकारच्या कचऱ्याने समुद्र कचराकुंडी बनत असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखीत झाले आहे. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता सागरी प्रदूषण रोखण्यासाठी गंभीर उपाययोजना राबविण्यासाठी शासन कोणते पाऊल उचलते हे पाहावे लागेल.

Web Title: Bumper waste matter found in tarkarli