आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस 6 ऑक्टोबरला बाहेर काढणार

The bus of Aambenali will be taken out on sixth October
The bus of Aambenali will be taken out on sixth October

महाड - पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचे बळी घेणारी विद्यापीठाची अपघातग्रस्त बस उद्या 6 ऑक्टोबरला दरीतून बाहेर काढली जाणार आहे. यासाठी पोलादपूर महाबळेश्वर मार्ग 6 ऑक्टोबरला सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत वाहतूकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

सदर अपघातग्रस्त बसची प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्फत तपासणी होणे आवश्यक असल्याने कोकण कृषी विद्यापिठाच्या मागणीनुसार ही बस बाहेर काढली जाणार आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाच्या 31 कर्मचाऱ्यांना घेऊन एम. एच. 08 ई 9087 या क्रमांकाची बस 28 जुलैला राहुरी गहु संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी महाबळेश्वर मार्गे निघाली होती. विद्यापीठाच्या रोहा विभागातून ही बस प्रवासासाठी मागविण्यात आली होती. सकाळी सव्वा अकरा वाजता आंबेनळी घाटात दाभिळ गावाजवळ बसचालका ताबा सुटल्याने आठळे फूट दरीत ही बस कोसळली.यात 30 जणांचा जागीच मृत्यू झाला तर प्रकाश सावंतदेसाई बाहेर फेकले गेल्याने वाचले. अत्यंत प्रतिकूल स्थितीत गिर्यारोहक, आपत्कालीन बचाव पथकाने सर्व मृतदेह बाहोर काढले. पोलिसांनी मृतांचे सामाम, मोबाईल व मौल्यवान वस्तु तपासाअंती विद्यापिठात जाऊन पोच केल्या. परंतु बचावलेले सावंत देसाई हेच बस चालवत असल्याचा आरोपही मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. यामुळे या घटनेनंतर त्यांच्या विरोधात मोर्चे आंदोलने झाली. परंतु याबाबतचे आवश्यक पुरावे हाती आले नाहीत तसेच हा अपघात नेमका कसा झाला याचीही माहिती उपलब्ध झाली नाही. या घटनेनंतर विद्यापिठाने मृतांच्या वारसांना नोकरी देण्याचे मान्य केले तर शासनाने भरपाईही दिली.  

आता अपघातात महत्त्वाची असलेल्या बसचा सांगाडा 2 महिन्यानंतर बाहेर काढला जात आहे. दरात बसचे तुकडे झाले असुन भागही विखुरले आहेत. परंतु या अपघाताची तांत्रिक तपासणी करण्याकरता बसचा सांगाडा उद्या बाहेर काढला जाईल. जिल्हाधिकारी यांनी ही बस काढण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक 6 ऑक्टोबरला सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. क्रेनच्या सहाय्याने अपघातात झालेल्या मदती प्रमाणेच बस सांगाडा बाहेर काढण्याचे काम केले जाणार आहे. या बसच्या स्टेरिंगवर हाताचे ठसे तपासले जाणार असल्याच्या अफवांचेही या परिसरात पिक आले आहे.

दरीतील बस काढण्याचा काम कोकण कृषी विद्यापीठाकडून केले जाणार असुन येथे आवश्यक तो पोलिस बंदाबस्त दिला जाणार आहे. या कामासाठी पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक 6 ऑक्टोबरला सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. - प्रकाश पवार (पोलिस निरिक्षक, पोलादपूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com