esakal | ग्रामीण रस्त्याच्या दुरूस्तीमध्ये खडीकरणाची अंदाजपत्रके कोणासाठी? 
sakal

बोलून बातमी शोधा

calculation estimates roads constructed in sindudurg kokan marathi news

रस्त्याची उंची किती, रूंदी कीती याचा अभ्यास केला जात नाही. सरसकट सर्वच रस्त्याना डांबरीकरणाबरोबर खडीकरणाचा समावेश करून अंदाजपत्रके बनविली जात आहेत.

ग्रामीण रस्त्याच्या दुरूस्तीमध्ये खडीकरणाची अंदाजपत्रके कोणासाठी? 

sakal_logo
By
नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण रस्त्याच्या दुरूस्तीमध्ये अनावश्‍यक खडीकरणाचा समावेश करून मोठ-मोठी अंदाजपत्रके बनविली जात आहेत. यामुळे ग्रामीण रस्त्यांना बंधाऱ्याचे स्वरूप आलेले पहायला मिळत आहे. तरी अनावश्‍यक मोठी अंदाजपत्रके नेमकी कोणाच्या भल्यासाठी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते खड्डेमय आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी बांधकाम विभागामार्फत अंदाजपत्रके बनविली जात आहेत. ही अंदाजपत्रके बनविताना रस्त्याला डांबरीकरण करताना खडीकरणाची आवश्‍यकता आहे का?

रस्त्याची उंची किती, रूंदी कीती याचा अभ्यास केला जात नाही. सरसकट सर्वच रस्त्याना डांबरीकरणाबरोबर खडीकरणाचा समावेश करून अंदाजपत्रके बनविली जात आहेत. यामुळे कमी खर्चात सुस्थितीत होणाऱ्या रस्त्यावरही दामदुप्पट निधी खर्च पडत आहेत. आवश्‍यक नसताना खडीकरण होत असल्याने ग्रामीण भागातील अरूंद रस्त्यांना बंधाऱ्याचे स्वरूप आलेले पहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील काही तर दुरूस्त होऊनही धोकादायक बनले आहेत. रस्त्याच्या बाजूला साईड पट्‌टी नाही. तीन ते चार फूट खोल गटारे यामुळे वाहनचालकाना दुसऱ्या वाहनाला बाजू देताना कसरत करावी लागत आहे. 

हेही वाचा- बाल मावळ्यांनी साकारले रायगड, तोरणा....

अभ्यास न करता डांबरीकर
ग्रामीण रस्त्यांच्या दुरूस्ती कामात डांबरीकरण करताना नाहक खडीकरणाचा समावेश केला जात असल्याने रस्त्यांची अंदाजपत्रके अनावश्‍यक वाढलेली दिसून येत आहे. गरज नसताना अनावश्‍यक निधी खर्चाची मोठ-मोठी अंदाजपत्रके बनविली जात आहे. नेमकी ही वाढलेली अंदाजपत्रके कोणाच्या भल्यासाठी ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 


हेही वाचा- वन्य प्राण्यांचा त्रास आला आता शेतीच्या मुळावर.....

रस्त्याना बंधाऱ्याचे स्वरूप
जिल्ह्यात सध्यास्थितीत ग्रामीण भागातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत; मात्र यातील बरेच रस्ते हे केवळ डांबरीकरण करून सुस्थितीत करता येण्यासारखे आहेत; मात्र प्रत्येकवेळी डांबरीकरणाबरोबरच खडीकरणाचा समावेश करून कित्तेक लाखाची अंदाजपत्रके बनविली जात आहेते. प्रत्येकवेळी खडीकरण करण्यात येत असल्याने रस्त्याची उंची किमान सहा ते आठ इंचाने वाढत आहे. यामुळे अनेक ग्रामीण रस्त्याना बंधाऱ्याचे स्वरूप आले आहे. तरी अनावश्‍यक खडीकरणाचे भले मोठे अंदाजपत्रक बनविण्यामागचे रहस्य काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  

loading image