प्राथमिक शिक्षक कुणाल पवारांची रक्तदान व अवयवदानासाठी मोहीम

blood-donation
blood-donation

पाली - सोशल मिडियाचा वापर रक्तदान व अवयवदान जनजागृतीसाठी तसेच गरजेच्यावेळी रक्तासाठी होणारी धावपळ थांबवून गरजू व्यक्तीला योग्यवेळी रक्त मिळावे यासाठी केला तर? हा विचार सुधागड तालुक्यातील राजिप शाळा पायरीचीवाडीचे उपक्रमशील शिक्षक कुणाल पवार यांच्या मनात आला.  त्यांनी सामाजिक बांधिलकी काळाची गरज म्हणून सोशल मिडियावर रायगड जिल्हा शिक्षक ब्लड बँक व्हॉट्सअप ग्रुप सुरु केला.

या ब्लड बॅंकेच्या पीडीएफचे काम हाती घेतले असून यात संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश असणार आहे. आतापर्यंत २८५ शिक्षकांनी आपली नोंदणी केली आहे. ही संख्या जास्तीत जास्त वाढावी यासाठी पवार यांचे प्रयत्न सुरु आहे.

याआधी कुणाल पवार यांनी व सुधागड तालुक्यातील शिक्षकांच्या सहकार्याने सुधागड शिक्षक ब्लड बँक या व्हाट्सअप ग्रुपची स्थापना केली. त्यांच्या या उपक्रमाला शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या शाळेतील गावाची म्हणजे पायरीचीवाडी ग्रामस्थ ब्लड बँक पीडीएफ उपलब्ध करुन दिली आहे.

बोले तैसा चाले
"रक्तदान हेच खरे जीवदान!" "अवयवदान हेच खरे सर्वश्रेष्ठ दान" हा संदेश कुणाल यांनी प्रत्यक्षात उतरवून दखविला आहे.  कुणाल पवार यांनी आपल्या लग्नाच्या वेळी सहपत्नीक अवयव दानाचा अर्ज भरून संकल्प केला. मागील वर्षी आपल्या वाढदिवशी रक्तदान करुन प्रत्येक वाढदिवशी रक्तदानाचा संकल्प केला आहे. आपल्या गावी घराबाहेर त्यांनी,"उठा जागे व्हा! रक्तदान व अवयवदानाच्या संकल्पाशिवाय थांबू नका." रक्तदान करा...अवयवदान करा....अशी प्रबोधनात्मक पाटी लावली आहे. अवयवदान व रक्तदानासाठी ते पदरमोड करून विविध प्रकारे प्रचार प्रसार करून प्रबोधन करत आहेत.

गरजेच्यावेळी आवश्यक रक्तगट लगेच उपलब्ध होईल याची श्वासती नसते. कोणालाही रक्तदान करायचे असले तरी फक्त रक्तगट माहित नसल्यामुळे रक्तदान करु शकत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुन कुणाल पवार यांनी ही मोहिम सुरु केली आहे. त्यांचा रक्तगटनिहाय पीडीएफ यादीमुळे  आपल्या रक्तगटाचे कोण - कोण आहेत याची माहिती सदस्यांना होणार असून गरजेच्यावेळी ते आपल्या रक्तगटातील व्यक्तीला संपर्क करु शकतात. किंवा अन्य गटाचे रक्त लागत असल्यास वेळ न घालवता त्यांना या ग्रुपच्या माध्यमातून त्वरीत माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे गरजू व्यक्तीस योग्यवेळी रक्त मिळून त्याचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे.

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून ब्लड बँक ही कल्पना उदयास आली. आता रायगड जिल्हा शिक्षक ब्लड बँक पीडीएफचे काम हाती घेतले आहे. ज्यांनी नोंद केली नसेल अशा सर्व रायगड जिल्हयातील शिक्षकांनी खालील लिंकवर आपली माहिती भरुन ही चळवळ अजून दृढ़ व व्यापक होण्यास सहकार्य करावे.

https://goo.gl/forms/Isp76AgMfODYIxM73  कुणाल पवार, प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा पायरीचीवाडी रायगड जिल्हा शिक्षक ब्लड बँक. मो.नं. 8446872102
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com