नडगिवे घाटीत 70 फूट दरीत मोटार कोसळली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

कणकवली ः गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार 70 फूट दरीत कोसळली. या अपघातात दोन जण जखमी झाले. हा अपघात महामार्गावर नडगिवे घाटीत आज दुपारी पावणेएकच्या सुमारास झाला.

कणकवली ः गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार 70 फूट दरीत कोसळली. या अपघातात दोन जण जखमी झाले. हा अपघात महामार्गावर नडगिवे घाटीत आज दुपारी पावणेएकच्या सुमारास झाला.

अपघातात करण कृष्णा कोळी, तसेच जयेश जोणचा (दोन्ही रा. मुंबई) यांना दुखापत झाली. मुंबई अंधेरी येथील काही तरुण गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. चालक बर्ना याकूब कानीपोव्हा (वय 28, रा. केरळ) हा मोटार (एम एच 43 डब्ल्यू 4360) घेऊन गोवा ते मुंबई असा परतत होता. महामार्गावर नडगिवे घाटी येथे चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. महामार्गावरील नडगिवे घाटीतील तीव्र वळणावर मोटार दरीत कोसळली.

मोटारीत वरुण गणेकर (वय 30), लोकेश कोळी (वय 28), सागर पाटील (वय 32), जयेश जोणचा (वय 28), करण कोळी (वय 29, सर्व रा. मुंबई, अंधेरी वर्सोवा) हे प्रवास करत होते. सुदैवाने ते बचावले. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलिस दूरक्षत्राचे पी. जे. राऊत, प्रतीक जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यांनी उपचारासाठी त्यांना खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मंडावरे यांनी त्यांच्यावर उपचार केले.

Web Title: car goes into 70 feet deep gorge