मराठीतूनही करिअर करता येते - शेखर निकम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

सावर्डे - प्रत्येक पालकाला वाटते की, माझा पाल्याला इंग्रजी फाडफाड बोलता आले पाहिजे. पालकांची ही अपेक्षा रास्त आणि स्वाभाविक असली तरी केवळ इंग्लिश बोलले म्हणजे झाले नाही. त्यासाठी चांगले संस्कार होण्यासाठी मराठी शाळेतील शिक्षण कित्येक पटीने सरस आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरची संधी आहे, असे मत सह्याद्री संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी व्यक्त केले.

सावर्डे (ता. चिपळूण) येथील सह्याद्री प्राथमिक शाळेतील ७७ विद्यार्थी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकली आहेत. त्यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव अशोक विचारे, संचालक आकांक्षा पवार, शांताराम खानविलकर, चंद्रकांत सुर्वे, प्रताप सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. 
पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी असे ः समर घाणेकर, सोहम लवटे, श्रावणी मोटे (पहिली, सर्वजण राज्यात दुसरे), प्रतीक गडदे, स्वरा खातू (चौथे), सेजल तोडकर (पाचवी), दुसरीमधील आर्या नांदिवडेकर (दुसरी), आर्या गमरे, आरोही क्षीरसागर (चौथी), तिसरीमधील प्रतीक कारंडे (पहिला), प्रणव मोहिरे (दुसरा), मधुराणी कातकर, विशाखा पवार (दोघी तिसऱ्या), वेदांत सुर्वे (पाचवा), तर चौथीमधील शर्वरी रेडेकर (प्रथम), अर्थव नांदिवडेकर, आदिती पाटील (चतुर्थ), श्रुती सरवदे (पाचवी).पहिलीमधील अक्षरा महाडिक, कुणाल वाझे, सई शेवाळे, मैथिली सोनवणे, समिधा खाडे, आदित्य मोरे, सुजल चव्हाण, नंदिनी राडे, ओंकार घाणेकर, दुसरीतील साक्षी गायकवाड, शार्दूल लकेश्री, सायली खानविलकर, आर्या जोंधळे, वेदिका जोशी, श्रवण घाणेकर, जुईली केळकर, मयुरेश कुळ्ये, राजवर्धन निंबाळकर, गायत्री राडे, सार्थक मोहिरे, तिसरीतील ऋतुराज धडस, सुयश जाधव, दीप्ती पवार, प्रार्थना गावणंग, कृष्णाई शिरगावकर, शुभम गुरव, चौथीतील आर्यन दडस, यश मोरे, सृष्टी कदम, विनित कदम यांच्यासह राज्याच्या यादीत अकरा ते अठरा क्रमांकापर्यत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके 
देण्यात आली.

Web Title: Career can be in Marathi