शेठ ज.नौ.पालीवाला महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न

अमित गवळे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पाली - येथील शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयात बुधवारी (ता.१) विद्यार्थ्यांसाठी संस्कार व करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते पाली पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक शिंदे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पाली - येथील शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयात बुधवारी (ता.१) विद्यार्थ्यांसाठी संस्कार व करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते पाली पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक शिंदे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शाळा व महाविद्यालये हि ज्ञानाची व संस्काराची केंद्र असतात. विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडून त्यातच करिअर घडवावे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम व आदर्श जिवनप्रणाली अंगिकारावी. आजचा विद्यार्थी उदयाचा भावी नागरीक असतो. शिस्तप्रीय, व्यसनमुक्त व वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासत देशाला महासत्तेकडे नेणारा समाज निर्माण झाला पाहिजे. अत्याधुनिक व विकसीत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन प्रगती साधणारी पिढी निर्माण झाल्यास राष्ट्र विकासाच्या दिशेने आगेकुच करेल असे शिंदे म्हणाले. तसेच त्यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्य युवराज महाजन यांनी ‘’काय करणार हे वयच असे असते’’ या मार्मीक व बोधक कवितेद्वारे प्रबोधन केले. आई वडीलांचे कष्ट त्याग व समपर्णाची जाणिव ठेवा. चांगले नागरीक होणेसाठी तत्पर रहा. शिका, खुप मोठे व्हा, महाविद्यालयाचे नावलौककिक करा असे प्राचार्य महाजन म्हणाले. यावेळी धम्मशिल सावंत, संतोष उतेकर यांनी देखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे, शेठ ज.नौ.पालीवाला महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महाजन पो.ह. प्रफुल्ल चांदोरकर, संतोष भोईर आदिंसह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्तीत होते.

विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्ये जबाबदारीची जाणिव करुन देणे गरजेचे आहे. त्यांना उत्तम शिस्त लागावी, त्यांच्या मनावर मुल्यांचे संस्कार रुजविले जावेत, त्यांचा पाया भक्कम व्हावा याकरीता त्यांनी शालेय जिवनात चांगल्या सवयी अंगिकारणे काळाची गरज असते. जिवनात सकारात्मक दृष्टीकोण बाळगा. बुध्दीवान व सामर्थ्यशाली युवा पिढीवर देशाचे उज्वल भवितव्य घडविण्याची मुख्य जबाबदारी असते. 
रविंद्र शिंदे, पोलीस निरिक्षक, पाली

Web Title: career guidance camp at Sheth JNPalivala College