कार्लोस आल्मेदा आपल्या मतदार संघात दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

श्री आल्मेदा यांना ता 8 मार्च ला घरातच ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. तेव्हापासून ते इस्पितळात उपचार घेत होते. केरळ येथे आयुर्वेदिक उपचार घेऊन ते गोव्यात परतले असून, आज सकाळी त्यांनी आपला दिनक्रम श्री दामोदर देवाचे दर्शन घेऊन सुरु केला.

मुरगाव - गंभीर आजारामुळे गेले 80 दिवस वास्को मतदार संघाचे आमदार कार्लोस आल्मेदा जनतेपासून दुरावले होते. ते आज सोमवारपासून नव्या जोमाने जनतेच्या सेवेत उतरले असून, वास्कोत दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम वास्कोकरांचे दैवत असलेल्या श्री दामोदर मंदिरात जाऊन आशिर्वाद घेतले.

श्री आल्मेदा यांना ता 8 मार्च ला घरातच ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. तेव्हापासून ते इस्पितळात उपचार घेत होते. केरळ येथे आयुर्वेदिक उपचार घेऊन ते गोव्यात परतले असून, आज सकाळी त्यांनी आपला दिनक्रम श्री दामोदर देवाचे दर्शन घेऊन सुरु केला. त्यानंतर त्यांच्या हस्ते पालिकेने खरेदी केलेल्या नव्या कचरा वाहू वाहनांचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी पत्रकारांकडे बोलताना श्री आल्मेदा यांनी जनतेचे आणि देवाचे आभार मानले. आपल्याला पुनर्जन्म लाभल्याचे ते म्हणाले. आपल्या गैहजेरीत जनतेची काही कामे अडकून पडलेली आहे. तसेच काही विकास प्रकल्प अडकले आहेत. त्याकडे आपण लक्ष देणार असल्याचे श्री आल्मेदा म्हणाले.वास्को शहरातील एफ एल गोम्स मार्गावर चौपदरी महामार्गावरील उड्डाण पूल जोडणार आहे. त्यामुळे जनतेला अनेक यातना भोगाव्या लागेल याबद्दल आपण लगेच लक्ष घालणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री आल्मेदा यांच्या समवेत यावेळी नगराध्यक्ष दीपक नागडे, नगरसेवक यतीन कामुरलेकर, भाजप नेते उमेश साळगावकर, युवा नेते गौरीष नाईक, विनायक घोंगे, हर्षद पवार, अनिल चोपडेकर, जयंत जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Carlos Almeida is return in his constituency