तो सारखा करत होता युवतीचा पाठलाग शेवटी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Case the young woman Crime on the perpetrator kokan martahi news

शहरातून कोलगाव तिठा असा दुचाकीवरून युवतीचा वारंवार पाठलाग करून त्रास दिल्याप्रकरणी येथील पोलिसात दिली तक्रार...

तो सारखा करत होता युवतीचा पाठलाग शेवटी...

सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : शहरातून कोलगाव तिठा असा दुचाकीवरून युवतीचा वारंवार पाठलाग करून त्रास दिल्याप्रकरणी येथील पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून संजय प्रमोद चोडणकर (वय ३०, रा. सावंतवाडी) यांच्यावर विनयभागांचा गुन्हा दाखल केला आहे.यातील युवती ही कुडाळ तालुक्‍यातील असून ती सहा वर्षांपूर्वी सावंतवाडी गवळी तिठा येथे एका खाजगी कंपनीत कामास होती.

हेही वाचा- माझ्याशी लग्न नाही केलं तर...

यातील संशयित संजय चोडणकर हा त्या ठिकाणी जाऊन सातत्याने तिचा पाठलाग करत होता. काल (ता.११) ही युवती कामानिमित्त येथे आली असता यातील संशयिताने तिचा पुन्हा पाठलाग केला. शहर ते कोलगाव तिठापर्यंत पाठलाग करून युवतीला त्रास देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. पाठलाग होत असल्याची माहिती मिळताच त्या युवतीने याबाबत आपल्या कुटुंबीयांना कल्पना दिली. त्यांनतर घटनास्थळी धाव घेत त्या युवकाचा शोध घेण्यात आला; मात्र घटनास्थळीवरून त्याने पलायन केले.

हेही वाचा- माझ्याशी लग्न नाही केलं तर...

 त्याने केला विनयभांग

संबंधित युवतीने सावंतवाडी पोलीसात धाव घेत संशयित संजय चोडणकर यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली आहे. त्यानुसार विनयभांगचा गुन्हा दाखल केला आहे. युवतीने यापूर्वीही पोलीसात पाठलाग करत असल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावर पोलिसांनी त्याला एक वेळ समज देऊन सोडले होते; मात्र सातत्याने त्या युवतीचा पाठलाग करून त्रास देण्याचा प्रकार संशयित संजय यांच्याकडून सुरूच होता. त्यामुळे अखेरीस हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती येथील पोलिसांनी दिली. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार कदम करत आहेत.