जिल्ह्यातील महादेव कोळी बांधवांना जातीचे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा

अमित गवळे 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

पाली- जिल्ह्यातील महादेव कोळी समाजातील अनेक बांधवांना जातीचे दाखले मिळत नव्हते. त्यामुळे त्यांना शिक्षण, नोकरी व शासन योजनांचा लाभ घेता येत नव्हता. महादेव कोळी समाजाला जातीचे दाखले मिळावेत याकरीता पालीत तरुण स्वप्निल गणेश बालके व पत्रकार प्रशांत हिंगणे यांनी शासनाकडे लढा उभारला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असुन आता रायगड जिल्ह्यातील महादेव कोळी बांधवांना जातीचे दाखले मिळणार आहेत.

यासंदर्भात या दोघांनी १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा देखिल दिला होता. रायगड जिल्हातील महादेव कोळी बांधवांना जातीचे दाखले देण्याचे प्रशासनाकडून बंद केले होते. जातीचे दाखले देणा-या अधिका-याकडून असे सांगण्यात येत होते की, शासनाकडूनच महादेव कोळी जातीचे दाखले देण्याचे बंद करण्यात आले आहेत. मात्र स्वप्निल बालके व नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र संघटनेचे रायगड जिल्हा आणि नवी मुंबईचे जिल्हासचिव प्रशांत हिंगणे यांनी माहितीच्या आधिकाराखाली यासंदर्भात माहिती मिळविली. त्यांना प्रांत अधिकारी रोहा यांच्याकडुन मिळालेल्या माहितीमधून १९८२ च्या शासन निर्णयानुसार रायगड जिल्हयातील सुधागड, कर्जत, खालापुर, अलिबाग, महाड या तालुक्यातील महादेव कोळी बांधवाना जातीचे दाखले देण्याचे सांगण्यात आले आहे. महादेव कोळी जातीचा १९५० पूर्वीचा पुरावा असेल तर महादेव कोळी जातीचा दाखला दिला जातो. तसेच घरातील रक्त संबंधातील व्यक्तीची जातपडताळणी झाली असेल तरही दाखला देण्यात येतो. या महितीमुळे आता या बांधवांना जातीचा दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माझ्या रायगड जिल्हयातील महादेव कोळी बांधवाना आता जातीचे दाखले हक्काने घेता येतील याचा आनंद होत आहे स्वप्नील बालके यांनी सांगितले.

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र रायगड संघटनेकडून स्वप्निल बालके आणि महादेव कोळी बांधवांच्या हक्कासाठी लढा दिला. जिल्हयातील महादेव कोळी बांधवाना आता नक्कीच शासकीय अधिकारी जातीचे दाखले देतील अशी आशा बाळगतो.
-प्रशांत हिंगणे, रायगड जिल्हा आणि नवी मुंबई जिल्हा सचिव, नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र,

Web Title: caste certificates for Mahadev Koli's in the district