अंबा नदी पुलावर सावधानतेचा इशारा

अमित गवळे
शुक्रवार, 13 जुलै 2018

पाली : येथील पाली-वाकण मार्गावर अंबा नदी पुलावरुन वारंवार पाणी जात अाहे. त्यामुळे पुलावरुन पाणी जात असतांना प्रवाशी व वाहनचालकांना खबरदारी व सावधानतेचा ईशारा देण्यासाठी एमएसअारडीसीतर्फे बुधवारी (ता.११)  अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजुला खबरदारीसाठी सुचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र याच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला अाहे.

मागील अनेक वर्षे पुलाजवळ अशा स्वरुपाचे सुरक्षेच्या सूचना देण्यासाठी कोणतेच फलक लावले गेले नव्हते. परिणामी सध्या हे सूचना फलक लावल्यामुळे नागरिक याचे स्वागत करत आहेत. मात्र लोखंडी फ्रेमवर फ्लेस्क लावलेले सूचना फलक पुलाच्या अगदी जवळ खाली उभे करण्यात अाले आहेत. तसेच त्याला दगडांचा अाधार दिला आहे.

पुलावरुन पाणी वाहू लागल्यास हे फलक फाटू व तुटू शकते. तसेच पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाण्याची शक्यत आहे. त्यामूळे हे फलक जर पुलाच्या काही अंतरावर वरच्या बाजुला उभे केले असते तर कदाचित त्याचा अधिक प्रभावी परिणाम झाला असता असे काही जाणकारांचे म्हणणे अाहे.

पुलाजवळ  सावधानतेचा इशारा देणारे सुचना फलक लावणे गरजेचे होते. मात्र लावण्यात अालेले हे फलक जर पुलापासून थोडे दुर व उंचावर लावले असते तर पुलावरुन पाणी गेल्यावर ते लांबूनच व  लवकर दिसले असते.  त्यामुळे पुलावर जाण्याअाधीच प्रवाशी व नागरिक खबरदार होतील.
- ललित ठोंबरे, मा. युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सुधागड

Web Title: Caution board installed near bridge on Amba River