सीईटी नीट सराव परीक्षा घेणार - सतीश सावंत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

कणकवली - सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक आणि एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातिर्फे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 ला सीईटी, तर 16 एप्रिलला नीटची सराव परीक्षा आयोजित केली असून, जिल्हा बॅंकेचे शाखेत प्रवेश अर्ज उपलब्ध करण्यात आल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे दिली. 

या वेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. के. भट, बॅंकेचे प्रशासकीय अधिकारी श्री. सावंत उपस्थित होते. अध्यक्ष श्री. सावंत म्हणाले, ""जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळावा म्हणून गेल्या वर्षीपासून बॅंक आणि अभियांत्रीकी महाविद्यालयातर्फे सराव परीक्षा घेतली जात आहे. गतवर्षी 1100 विद्यार्थी सहभागी झाले होते. यंदा 1 ते 6 एप्रिल या कालावधीत या दोन्ही सराव परीक्षांसाठी प्रवेश अर्ज स्विकारले जाणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांच्या परिसरातील जिल्हा बॅंकेच्या शाखेत सकाळी साडेअकरा ते साडेचार या वेळेत अर्ज उलब्ध करून ते भरून सादर करावेत. संबंधित प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 10 ते 13 एप्रिलला त्याच शाखामध्ये परीक्षा प्रवेशपत्र दिले जाईल. एमएचटी-साईटी ही सराव परीक्षा 15 एप्रिलला, तर नीट 2017 ही सराव परीक्षा 16 एप्रिलला एसएसपीएम महविद्यालयात सकाळी 9 वाजता होणार आहे. विद्यार्थ्यांना एसएसपीएमच्या संकेत स्थळावर (www.sspmcoe.ac.in) हिती उपलब्ध असून त्याची प्रत जिल्हा बॅंकेत जमा करता येईल. नोंदणी अर्ज भरताना दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्‍यक आहेत.'' 

कणकवलीत 3 ला मार्गदर्शन 
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रहार स्वामी विवेकानंद सभागृहात परीक्षा पूर्व तयारीविषयी सकाळी 10 ते 1 या वेळेत मार्गदर्शन होणार आहे. लातूर येथील शाहू महाराज विद्यालयाचे प्राध्यापक मार्गदर्शन करणार असून अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. 

Web Title: CET well take practice exams