गृहमंत्रीपदावरून चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला 'हा' सल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूकीतील भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांच्या प्रचारासाठी ते आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा सल्ला दिला.  

रत्नागिरी - गृहमंत्रीपद निदान राष्ट्रवादीला देवू नका, ते राष्ट्रवादीला दिलं तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील. सर्वच खाती देवून टाकलीत. तुम्ही गृहमंत्रीपद दिले तर तुम्ही अडचणीत याल,  असा सल्ला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला.  

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूकीतील भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांच्या प्रचारासाठी ते आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा सल्ला दिला.  ते म्हणाले, खुप वर्ष आम्ही शिवसेनेसोबत एकत्र काम केलं आहे. भाजप फक्त शिवसेनेला टार्गेट करतंय असं दाखवलं जात आहे. पण ते पूर्णतः चुकीचे आहे.   

हेही वाचा - काँग्रेसचा व्हीप डावलून भाजपने मारली येथे बाजी 

ठाकरे हे युटर्नचे मुख्यमंत्री

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे युटर्नचे मुख्यमंत्री असल्याचा पुनरुच्चार श्री. पाटील यांनी केला. पोलिस भरतीचे भाजप सरकारचे निकष बदलण्याचा खरपुस समाचारही यावेळी त्यांनी घेतला. 

शहरातील नळपाणी योजनेचे काम १० टक्केही नाही

रत्नागिरी नगरपालिकेची ही लादलेली निवडणूक आहे आणि या निवडणुकीत भाजप जिद्दीने उतरली आहे. रत्नागिरी शहरातील विकासाची अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीसाठी मंजूर केलेल्या नळपाणी योजनेचे काम १० टक्के देखील झाले नाही. या सर्व राहिलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले.

हेही वाचा - रत्नागिरीत काँग्रेस भुवनला का लावले टाळे ? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil AdvisedTo Shiv Sena On Home Minister Post